हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६ च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन संपूर्ण तरुण वर्गात चर्चेत आहे. अनपेक्षितपणे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून बिग बॉस १६ ची ट्रॉपी जिंकल्यानंतर एमसी स्टॅनचा वैयक्तिक आयुष्यातील एक वेगळा प्रवास सुरु झाला आहे. एमसी स्टॅनच्या गाण्यांनी आधीच जगभरात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सगळ्यांच्या मनात बसणाऱ्या एमसी स्टॅनच्या मनात मात्र फक्त आणि फक्त बुबा आहे आणि लवकरच तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे अशी माहिती त्याने स्वतःच दिली आहे.
बिग बॉसच्या घरात असताना अनेकदा एमसी स्टॅन आपल्या गर्लफ्रेंडबद्दल बोलताना दिसला. कधी तिच्या आठवणीत झुरताना दिसला तर कधी तिच्यासोबतचे किस्से सांगताना दिसला. प्रेमात नुसता पडलो नाही तर वेडा झालो असेही म्हणताना दिसला. त्यामुळे ज्या लोकांना एमसी स्टॅन माहित आहे त्यांना आता बुबा माहित नाही असं होऊच शकत नाही. अनेकदा आपलं बुबावर किती प्रेम आहे हे न विसरता सांगणारा एमसी स्टॅन आता लग्नाचं प्लॅनिंग करतोय. गेल्या चार ते पाच वर्षांपासून एका नात्यात असलेले एमसी स्टॅन आणि बुबा आता लग्न करणार आहेत.
अलीकडेच एमसी स्टॅनने बुबासोबत लग्न करण्याबाबत भाष्य केलं आहे. एमसी स्टॅनने आपण गेली चार-पाच वर्षे बुबासोबत नात्यात असल्याचा खुलासा करीत सांगितले कि, येत्या एक- दीड वर्षात ते दोघे लग्न करणार आहेत. एमसी स्टॅनने हि माहिती दिल्यानंतर त्याचे चाहते फारच आनंदी झाले आहेत. एमसी स्टॅनला दुल्हेराजा बनलेलं पाहण्यासाठी पब्लिक आतुर झाली आहे. एक वेगळी भाषा आणि एक वेगळा तरंग घेऊन समोर आलेला एमसी स्टॅन येत्या काळात संगीत दौरे करताना दिसताना आहे. त्यामुळे विविध राज्यातील चाहत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आपण उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले आहे.
Discussion about this post