Take a fresh look at your lifestyle.

थर्ड क्लास मीरा, फर्स्ट क्लास मिनल; टास्कदरम्यान झालेल्या प्रकारामुळे मीरावर नाराज प्रेक्षकांकडून मिनलवर कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवर सुरु असलेल्या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिजनची बातच काही और आहे. याआधीच्या २ सिजनमध्ये जितके वाद, पंगे आणि कटकट पहिली नाही तेवढा सगळं मसाला यंदाच्या सिजनमध्ये आहे. घरात स्पर्धकांमध्ये टास्क सुरु झाला का मग त्यांच्या चढाओढ हि कायमच पाहायला मिळते. क्वचितच एखादा टास्क पार पडतो. ज्यामुळे रसिकही त्यांचे तोंडभरुन कौतुक मनभरून टीका करताना दिसतात. यंदाच्या सिझनमध्ये सगळेच स्पर्धक वाद करण्यात, स्वतःला सिद्ध करण्यात चुरशीची लढत देत असताना स्पर्धक मिनल शाह छा गयी! नुकत्याच संयमाची ऐशी तैशी हा टास्क पार पडला. यावेळी एका स्पर्धकाकडून दुस-या स्पर्धकाला मिळणारे टास्क पूर्ण करायचे धाडस करुन दाखवायचे होते आणि मीनलने हा टास्क १००% खेळला आहे.

टास्कमध्ये स्पर्धक मीरा जगन्नाथ राक्षस आणि मीनल शाह देवदूत होती. दरम्यान मीराने मीनलला टास्कमधून बाहेर काढण्यासाठी नको नको त्या शक्कल वापरताना मीनलला चक्क टक्कल कर असा आदेश दिला. ट्रीमरने सगळे केस काढून टक्कल करायचं असं मीराने मीनलला सांगितलं आणि यावर बिनधास्तपण मीनलने हा टास्क पूर्ण करायचे धाडस दाखवले. नकार न देता टक्कल करायला ती तयार झाली. दरम्यान मीनल टक्कल करणारच इतक्यात मीराने तिला रोखले. भले टास्क अपूर्ण राहिला पण मिनलने मन जिंकलं ना भाऊ. यामुळे ‘बिग बॉस पाहणाऱ्या प्रेक्षकांनी तीच तोंडभर कौतुक आणि मीराला बहू टीकांचा मार दिला आहे.

        

तू एकटी तिथे सगळ्यांवर भारी पडतेस, मीनल तू ग्रेट आहेस, जिंकलंस पोरी, फर्स्ट क्लास मीनल. अश्या विविध प्रतिक्रियांमधून प्रेक्षकांनी मिनलच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे मीरा जगन्नाथवर रसिक चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. एका मुलीने दुस-या मुलीला टक्कल कर म्हणून सांगणे अजिबात योग्य नाही. मीरा एकदम थर्ड क्लास आहे. मीरावर योग्य संस्कार नाहीत. त्या टक्कल पेक्षा तुम्ही अक्कल खूप कमी आहे मीरा. अश्या विविध प्रतिक्रियांमधून प्रेक्षकांचा संताप आणि मीरावर ओढलेले ताशेरे हे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. एकंदरच मीराचे असे वागणे खटकल्याचे पाहायला मिळत आहे. तर मीराने मीनलसाठी आखलेली खेळी तिच्यावरच उलटली असे म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे मीनल प्रेक्षकांची लाडकी स्पर्धक झाली आहे यात काहीच शंका नाही.