हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस’ मराठीचा ३ रा सीजन चांगलाच रंगात आला असताना आता जो तो जिंकण्यासाठी खेळतोय हे स्पष्ट दिसू लागलं आहे. यामुळे प्रत्येकवेळी नव्या नव्या टास्कदरम्यान कुणा ना कुणाची कडाडून भांडण होताना दिसतातच. त्यात यंदा स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या मुलांइतक्याच मुलीसुद्धा चांगल्याच वरचढ आहेत. यामुळे घरात रंगणाऱ्या टास्कसोबतच त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील वादविवाद आणि भांडणांमुळे जो तो चर्चेत येत असतो. नुकतेच या शो चे ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले असून हे स्पर्धक या घरात एकत्र राहत आहेत. त्यामुळे साहजिकच स्पर्धकांमध्ये मतभेद होत असल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच आता दररोजच्या वादाला कंटाळून मीराने मोठं पाऊल उचललं आहे आणि चक्क जेलच्या दरवाजावर स्वतःच डोकं आपटलं आहे.
नुकतेच कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सोनाली आणि मीरामध्ये कडाक्याचं भांडण होताना दिसतय. इतकंच नाही तर आता मीरा जगन्नाथच्या संयमाचा अंत झाला असून ती चक्क ढसाढसा रडायला लागल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये मीरा आणि सोनाली यांच्यात भांडण होताना दिसत आहे. इतकंच नाही तर रागाच्या भरात मीरा तिचं डोकं जेलच्या दरवाजावर आपटतांना दिसत आहे.
या भांडणादरम्यान दोघीही एकमेकींना वरचढ होताना दिसत आहेत आणि शेवटी सोनालीसोबतच्या रोजच्या वादाला वैतागून मीरने डोकेफोडी केल्याचे दिसत आहे. पण झालाय असं कि, हा प्रसंग पाहता नेटकऱ्यांनी मात्र मीराला चांगलाच ट्रोल केलाय. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करताना लिहिले कि झाली हिची नाटक सुरु. तर काहींनी असेही म्हटले आहे कि आधी बिग बॉस असणारी मीरा आता कॅप्टन झाली तर वेगळेच रंग दाखवू लागली आहे. याशिवाय काही नेटकरी म्हणू लागले आहेत कॅप्टनशीप मिरच्या डोक्यात गेली आहे. तिला वाटतं ती राजा आहे आणि बाकीच्यांनी प्रजा म्हणून झुकलं पाहिजे. तर काही नेटकऱ्यांनी अगदी मिश्कीलपणे एव्हढा मोठा होता का वाद डोकं फोडून घ्यायला? अशीही विचारणा केली आहे. अश्या विविध कमेंटच्या माध्यामातून नेटकरी मीराला ट्रोल करत आहेत.