Take a fresh look at your lifestyle.

मेहंदी है रचनेवाली! रा-लिया’च्या लग्नाची धामधूम; रणबीरच्या निवासस्थानी रीतींना सुरुवात

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील क्युट आणि बहुचर्चित बी टाऊन कपल आलिया- रणबीर सात जन्माची गाठ बांधण्यास सज्ज झाले आहेत. येत्या 14 एप्रिल २०२२ रोजी आलिया रणबीर विवाह बंधनात अडकणार आहेत. आजपासून त्यांच्या लग्ना आधीच्या रीती रिवाजांना सुरुवात झाली आहे. आज दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी त्यांची मेहंदी सेरेमनी जल्लोषात सुरु आहे. रणबीरच्या मुंबई स्थित निवासस्थानी हा मेहंदीचा कार्यक्रम रंगला आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर ‘वास्तू’ या निवासस्थानी आज १३ एप्रिल रोजी मेहंदीचा कार्यक्रम रंगतोय. दरम्यान या कार्यक्रमाला कपूर कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक, मित्र मंडळी आणि इंडस्ट्रीतील निकटवर्तीय उपस्थित आहेत. तर भट्ट कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी देखील मोठा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आलियाची बहीण पूजा भट्ट हिने महेश भट्ट यांच्यासोबत कार्यक्रमाला हजेरी लावली. दरम्यान तिने पँराझींना हातावरील मेहंदी सुद्धा दाखवली.

रणबीर आलियाच्या मेहंदीच्या कार्यक्रमासाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर अनेक मंडळी उपस्थित होती. यामध्ये करीना कपूर खान, करिष्मा कपूर, करण जोहर, अयान मुखर्जी, दिव्या कोसला आणि इतर अनेक मंडळी उपस्थित आहेत. रणबीरच्या घराला केलेली प्रकाशमय सजावट हि त्याच्या आयुष्यात आलियाच्या पावलाने येणाऱ्या सुवर्ण दिवसांचे प्रतिबिंब दर्शविते. या क्युटेस्ट कपलला सोशल मीडियावर जितकं ट्रेंडिंग आहे तितकेच आशीर्वादही लोक देताना दिसत आहेत.