Take a fresh look at your lifestyle.

सिद्धू मुसेवालाच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा; मिका सिंगची पंजाब सरकारला विनंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्यावर काही हल्लेखोरांनी ३० राउंड फायर करून त्याची हत्या केल्याच्या खळबळजनक घटनेने संपूर्ण सिने इंडस्ट्री हादरली आहे. या घटनेचा सिनेइंडस्ट्रीतून संताप आणि निषेध व्यक्त केला जातोय. यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत पंजाबी गायक आणि बॉलिवूडचा पॉप सिंगर मिका सिंग यानेही संताप व्यक्त केलाय. दरम्यान त्याने आपण पंजाबी असल्याची लाज वाटते असेही म्हटले आहे आणि यासोबतच त्याने पंजाब सरकारला सिद्धूच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी विनंती केली आहे.

पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला याची रविवारी २९ मे २०२२ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानसाच्या जवाहर गावाजवळ त्याच्यावर हा गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर, २० वर्षीय सिद्धू याला गंभीर अवस्थेत मानसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत मुसेवालासोबत असलेले आणखी २ जण जखमी आहेत. मुख्य म्हणजे सिद्धू मुसेवालाची सुरक्षा व्यवस्था राज्य सरकारने काढून घेतल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी त्याची हत्या करण्यात आली आहे.

पंजाबी गायक मीका सिंगने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर सिद्धू सोबतचा एक फोटो शेअर केलाय. यासोबत कॅप्शन देताना मीका सिंगने लिहिले कि, “मी नेहमीच म्हणतो की, मला पंजाबी असल्याचा गर्व वाटतो. पण आज मला असं म्हणताना लाज वाटतेय. कारण २८ वर्षांचा एक मुलगा जो एवढा प्रसिद्ध होता. ज्याचं भविष्य एवढं चांगलं होतं. पण त्याची पंजाबमध्ये पंजाबी लोकांनीच हत्या केली. देव त्याच्या आत्म्यासा शांती देवो. त्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी पंजाब सरकरला विनंती करतो की त्यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी.”

याशिवाय सिंगर मीका सिंगने सिद्धू मूसेवालासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे कि, “तुझी खूप आठवण येतेय भाई. तू खूप लवकर निघून गेलास. तू तुझं काम, गाणी, तू कमावलेली प्रसिद्धी आणि हिट रेकॉर्ड्समुळे नेहमीच सर्वांच्या आठवणीत जिवंत राहशील. तुझी हिट लाइन #Dildanimadasidhumussewala ला तुझे चाहते नेहमीच लक्षात ठेवतील.

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो. सतनाम वाहेगुरू.” या घटनेवर मिका व्यतिरिक्त शहनाझ गिल, मुनव्वर फारूखी, आसिम रियाज, मिका सिंग, सोनू सूद, अजय देवगण, कपिल शर्मा अशा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुःख आणि संताप व्यक्त केला आहे.