Take a fresh look at your lifestyle.

मिका सिंगचा पत्रकार परिषदेत राडा; राखी सावंतवरून प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला केली शिवीगाळ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील पॉप सिंगर मिका सिंग त्याच्या हटके स्टाइलमुळे चर्चेत असतो. पण यावेळी पत्रकार परिषदेत झालेल्या राड्यामुळे तो चर्चेत आहे. ड्रामा क्वीन राखी सावंत आणि मिका सिंग यांचे संबंध कसे आणि किती चांगले होते वा आहेत ते त्यांचं त्यांनाच माहित. पण त्यांच्यातील वाद मात्र सर्वश्रुत आहे. दरम्यान लवकरच मिकाचा ‘स्वयंवर- मिका दी वोटी’ हा रिअॅलिटी शो सुरु होणार आहे. यामध्ये तो त्याच्या वधूच्या शोधात आहे. याच शोच्या प्रमोशनसाठी मिकाने दिल्लीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते आणि इथे राखीवरून प्रश्न विचारताच त्याची सटकली. मग काय त्याने पत्रकाराला शिवीगाळ केली आणि मुलाखत न देताच परिषद सोडून निघून गेला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, सिंगर मिका सिंगने या पत्रकार परिषदेत एका वरिष्ठ पत्रकाराला शिवीगाळ केली आहे. तसेच चालू परिषदेतून तो उठला आणि इतर कोणाच्याही कोणत्याही प्रश्नांची उत्तरं न देताच तो तिथून निघून गेला. त्याचे झाले असे कि, पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर एका पत्रकाराने मिकाला राखी सावंतबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न असा कि, तुझ्या या स्वयंवर शोमध्ये राखीसुद्धा भाग घेणार आहे का..? हा प्रश्न ऐकताच मिकाला असा काही राग अनावर झाला कि बस्स. उपस्थित माध्यमांसमोर तो काहीच उत्तर न देता तिथून निघून गेला आणि राखीबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारासह शोच्या संपूर्ण टीमला एका रुममध्ये बोलावून त्याने झापझाप झापले. दरम्यान मिकाने पत्रकाराला शिवीगाळ केली.

यामुळे हे तर स्पष्टच होते कि, राखीबद्दल प्रश्न विचारल्यामुळे मिका सिंगला राग आला. शिवाय वाद घालताना तो म्हणाला कि, तिच्याशी माझी तुलनाच कशी होऊ शकते. यानंतर त्याने मुलाखत देण्यासही नकार दिला”, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. घडलेल्या प्रकारानंतर शोच्या संपूर्ण टीमने पत्रकार वर्गाची माफी मागितली. तसेच त्या रुममध्ये जे काही घडलं त्याबद्दल कोणालाही काहीच कळू नये, अशी त्यांनी विनंती केली. मात्र हि गोष्ट सर्वांसमोर आता उघड झाली आहे. यामुळे सोशल मीडियावर मीकाच्या कृत्याचा निषेध केला जात आहे.