Take a fresh look at your lifestyle.

पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राच्या समर्थनार्थ उभा राहिला मिका सिंग, म्हणाला…

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्राला अश्लील पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर या प्रकरणी त्याच्याव्यतिरिक्त अन्य ५ जणांना अटक केली असून राज या प्रकरणातील प्रमुख असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. यातच आता मिका सिंगने मात्र राजच्या समर्थनार्थ भाष्य केले आहे. मिका सिंगने मुंबईमध्ये सेलिब्रिटी मीडिया फोटोग्राफर्ससोबत बोलताना म्हटले आहे कि, राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती आहे. तसेच, या अ‍ॅपसंदर्भात आपल्याला अधिक माहिती नाही, पण त्याच्या इतर अ‍ॅपपैकी एक अ‍ॅप मी पाहिले आहे.

सविस्तर सांगायचे तर मिका सिंग म्हणाला कि, “मी तर काय होईल याची वाट पाहत आहे. बघूया… जे होईल चांगलेच होईल, त्यांच्या अ‍ॅपसंदर्भात मला फारसे माहीत नाही. मी एक अ‍ॅप पाहिले होते. ते सिंपल अ‍ॅप होते. त्यात फार काही नव्हते. त्यामुळे चांगलेच होईल अशी आशा करूया. मला वाटते, की राज कुंद्रा एक चांगली व्यक्ती आहे. आता बघू सत्य काय आणि असत्य काय, जे न्यायालयच सांगू शकते.” यानंतर आणखी अनेको कलाकारांनी याविषयी आपापल्या प्रतिक्रिया देत विविध भाष्य केले आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये मढ परिसरातील एका बंगल्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. तेव्हा संबंधित ठिकाणी अश्लील चित्रपट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणाच्या तपासाचा एक भाग म्हणून राज कुंद्राला अटक केली आहे, असे समोर आले. इतकेच नव्हे तर, क्राइम ब्रांचच्या तपासानुसार राजने या उद्योगासाठी १० कोटी रुपये लावले होते. कुंद्रा केंद्रिन कंपनीशी संबंधित असल्याचे फेब्रुवारीमध्येच स्पष्ट झाले होते. मात्र थेट लिंक असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने क्राइम ब्रांचचा तपास अद्याप सुरू होता. मात्र सोमवारी रात्री राज कुंद्राला अटक करून सखोल चौकशी झाली त्यानंतर कोर्टातही हजार केले गेले. दरम्यान न्यायालयाने राजला २३ जुलै २०२१पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.