Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तिने क्षणात सगळ्यांनाच..; ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धला लागला ऑनस्क्रीन नातीचा लळा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 20, 2022
in Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Milind Gawali
0
SHARES
4.1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांत या मालिकेने एकावर एक ट्विस्ट देत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेतील अभिचे विवाह बाह्य संबंध त्याची आई अरुधंतीला समजणे, त्यानंतर अनघाच्या डोहाळ जेवण्यात गौप्यस्फोट होणे, अनघा आणि बाळाचा जीव धोक्यात येणे, त्यानंतर अनघा बाळासह सुखरूप देशमुखांच्या घरी येणे.. बापरे बाप.. एकावर एक असे काही ट्विस्ट आले कि बस रे बस.. पण आता मालिकेत चिमुकल्या परीचं आगमन एक वेगळाच उत्साह आणि आनंद घेऊन आले आहे. मालिकेत अनिरुद्ध भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना तर ऑनस्क्रीन नातीचा प्रचंड लळा लागला आहे. त्यांनी या चिमुकल्या पारीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा ते विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. यावेळी मिलिंद गवळी यांनी ऑनस्क्रीन नातीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद गवळींनी नुकतंच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते त्यांच्या ऑनस्क्रीन नातीबरोबर खेळताना दिसत आहेत. यात ते बाळसुद्धा मिलिंद यांच्यासोबत मस्त रमलं आहे. मालिकेत अभिषेक आणि अनघाला मुलगी झाली आणि त्यानिमित्ताने मालिकेच्या परिवारात या चिमुकल्या परीचा समावेश झाला.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

मिलिंद गवळी यांनी या व्हिडीओ पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘गोड गोंडस परी राणी”त्विशा” “आई कुठे काय करते “ या मालिकेमध्ये देशमुख कुटुंबात आता आली आहे एक नवीन मेंबर… कसली गोंडस आहे “त्विशा“. सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही, पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं, असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय, भेटलोय, अगदी आपल्या कुटुंबांमध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं, तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं. लहान बाळ असेल तर आपोआपच भाभी चैतन्य पसरतं, जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं, चेहऱ्यावरील निरागस हास्य, आमच्या सेटवरचे वातावरणच बदलून गेलं आहे. प्रेक्षकांना सूधा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून .’

Tags: Aai Kuthe Kay KarteInstagram PostMilind GawaliViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group