Take a fresh look at your lifestyle.

मिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध लेखकाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा!!

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेब सीरीजचे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘मिर्झापूर 2’ची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. मात्र, ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यापासून ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यातच आता आणखी एक नवा वाद उभा राहिला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार सुरेंद्र मोहन पाठक (Surendra Pathak) यांनी मिर्झापूरच्या निर्मात्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

धब्बा’ या हिंदी कादंबरीचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी वेब सीरीजमधील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. एका दृश्यादरम्यान ‘धब्बा’ या कादंबरीचा चुकीचा वापर दाखवला गेला आहे,. जर, त्वरित हे दृश्य हटवले नाही तर, मालिकेचे निर्माते आणि अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘मिर्झापूर 2’ एका दृश्यामध्ये कुलभूषण खरबंदा ‘धब्बाड’ नावाचे पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्यांच्या हातात पुस्तक असताना बॅकग्राऊंडला काही आक्षेपार्ह ओळींचा व्हॉईओओव्हर ऐकू येतो. या व्हॉईसओवरचा पुस्तकाशी काही संबंध नाही, असा लेखकाचा आरोप आहे. या दृश्यावर आक्षेप घेत, त्यांनी दृश्य हटवण्याची मागणी केली आहे

मिर्झापूर 2’मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली आहे. कथेत रंजकता आणण्यासाठी यावेळच्या दुसऱ्या पर्वात काही नवीन कलाकारदेखील दिसले आहेत. ‘मिर्झापूर’ प्रमाणेच ‘मिर्झापूर 2’मध्येही कालीन भैय्याच्या जादूने प्रेक्षक खुर्चीशी खिळून राहिले आहेत. ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यांनतर सोशल मीडियावरदेखील या वेब सीरीजची हवा पाहायला मिळाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.