Take a fresh look at your lifestyle.

‘मिर्झापूर 2’ फेम अभिनेत्याचा राहत्या घरी आढळला संशयास्पद मृतदेह; गूढ कायम

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मिर्झापूर’ फेम अभिनेता ब्रह्म मिश्रा यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वर्सोवा येथील यारीरोड परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत ब्रह्म राहत होते. त्यांच्या राहत्या फ्लॅटमधील बाथरूमध्ये त्यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. ब्रह्म मिश्रा यांच्या खोलीतून अतिशय दुर्गंध येत असल्याने शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती संबंधित विभागातील पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी अभिनेत्याच्या खोलीचे दार उघडून पाहिले असता त्याच्या बाथरूममधून ही दुर्गंधी येत असल्याचे उघड झाले. नेमका हा मृत्यू कसा झाला याबाबत पोलीस तपास करीत असून अद्याप याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता बाथरूमला गेला असताना त्याचा मृत्यू झाला असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर ब्रह्म यांचा मृतदेह ठाण्यातील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपस वर्सोवा पोलीस करत आहेत. ब्रह्म मिश्रा यांचा मृत्यू अत्यंत गुढमय आणि संशयास्पद असल्यामुळे याबाबत कोणतीही शक्यता व तर्क लावणे टाळण्यात आलेले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी कलाविश्वात पसल्यानंतर यावर शोक व्यक्त केला जात आहे.

अभिनेता ब्रह्म मिश्रा यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांना ‘मिर्झापूर २’मधील सहाय्यक भूमिकेमुळे विशेष प्रसिद्धी मिळाली. त्याचसोबत त्यांनी साकारलेली ललित ही भूमिकादेखील चांगलीच लोकप्रिय झाली होती.

ब्रह्म मिश्रा हे मूळ भोपाळचे होते. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे २०१३ सालामध्ये त्यांनी ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तसेच ब्रह्म यांनी अक्षय कुमारच्या ‘केसरी’ या चित्रपटात ‘खुदादद खान’ची भूमिका साकारली होती. अभिनेता दिव्येंदू शर्माने आपल्या इंस्टाग्रामवर शोक व्यक्त करीत ‘आपला ललित या जगात राहिला नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात’, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत.