Take a fresh look at your lifestyle.

‘मिर्झापूर-२’ चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित ; पहा व्हिडिओ

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बहुप्रतिक्षित ‘मिर्झापूर 2’ या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गुन्हेगारी विश्वावर आधारित असलेली ही वेब सीरिज आता या दुसऱ्या सीझनमध्ये वेगळे वळण घेताना दिसणार आहे. आता या सीरिजमध्ये रिव्हेंज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाला होता. दुसऱ्या सीझनमध्ये कालीन भैया आणि त्यांचा मुलगा मुन्ना भैया या दोघांना टक्कर देण्यासाठी, बदला घेण्यासाठी गुड्डू भैया येणार आहे. पहिल्या भागात गुड्डू आणि त्याच्या भावाने कालीन भैयाच्या दहशतीचे साम्राज्य मिर्झापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरवल्याचे दाखवले होते. आपल्यापेक्षा गुड्डू आणि त्याच्या भावाला जास्त महत्त्व मिळत असल्याचे बघून दुखावलेला कालीन भैयाचा मुलगा मुन्ना भैया आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करतो. यात गुड्डूचा भाऊ आणि गुड्डूची प्रेयसी यांना गोळी लागते. गुड्डूच्या पायाला गोळी लागते.

पण गुड्डूच्या भावाला आवडू लागलेली गोलू वाचते. गोळीबारामुळे निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन गोलू जखमी झालेल्या गुड्डूला वाचवण्यात यशस्वी होते. एका पायाला दुखापत झालेला जखमी गुड्डू भावाच्या आणि प्रेयसीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तयारी करतोय असे टीझरमध्ये दिसले होते. ‘हमारा एक ही उद्देश है जान से मारेंगे; क्योंकि मारेंगे तभी जी पाएंगे’, असे म्हणत गुड्डू शस्त्रसज्ज होत असल्याचे  दाखवण्यात आले होते. आता बदला घेण्यासाठी गुड्डूला गोलूची मदत मिळणार आहे.

मिर्झापूर २’ या सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल, कुलभूषण खरबंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २३ ऑक्टोबरपासून मिर्झापूर 2 अर्थात या वेबसीरिजचा दुसरा सिझन भेटीला येतो आहे. कालीन भय्या, मुन्ना भय्या आणि गुड्डू भय्या यांच्यातली जबरदस्त टक्कर या सिझनमध्ये पाहण्यास मिळणार आहे यात काही शंकाच नाही. उत्तरेकडील राजकारण आणि त्यातून येणारी गुंडगिरी याचे उत्तम चित्रीकरण मिर्झापूरमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे आता ‘मिर्झापूर २’साठी चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’