Take a fresh look at your lifestyle.

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नताशा सूरीला कोरोनाची बाधा

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रधुर्भाव वाढतच चालला आहे. कोरोना महामारीत फक्त सामान्य माणूसच नव्हे तर मोठमोठें कलाकार राजकीय नेते यांनाही कोरोनाची लागण होताना दिसत आहे. अशातच आता नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री नताशा सूरी हिचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नताशाने स्वतः करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. नताशा सध्या होम क्वारंटाइन आहे.

नताशाने बॉम्बे टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, ती गेल्या आठवड्यात पुण्याला काही कामानिम्मित पण गेली होती. पुण्याहून मुंबईला परतल्यानंतर तिची प्रकृती बिघडली अन् तिला करोनाची लक्षणं जाणवली. ताप, घशाला त्रास आणि अशक्तपणा जाणवल्यानंतर नताशानं तीन दिवसांपूर्वी करोनाची चाचणी केली. या चाचणीत तिचा कोरोना अहवाल आला आहे.

करोनाची बाधा झाल्यामुळे नताशा तिच्या ‘डेंजरस’ या चित्रपटाचे प्रमोशन करु शकत नाही. या चित्रपटाचे प्रमोशन १० ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. या चित्रपटात तिच्या सोबत बिपाशा आणि करणसिंह ग्रोवरही दिसणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन करु न शकत नसल्यामुळे दुखी असल्याचं नताशानं सांगितलं.

Comments are closed.