Take a fresh look at your lifestyle.

मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूंचे मिस युनिव्हर्स 1994 आणि 2000 कडून भरभरून कौतुक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मिस युनिव्हर्स २०२१ ही ७० वी ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा होती, जी १२ डिसेंबर २०२१ रोजी इस्रायलमधील इलात येथील युनिव्हर्स डोम येथे आयोजित करण्यात आली होती. मेक्सिकोच्या आंद्रिया मेझा हिने स्पर्धेच्या शेवटी भारताच्या हरनाज संधूला उत्तराधिकारी म्हणून घोषित करून मुकुट दिला. मुख्य माहितीनुसार तब्बल २१ वर्षांनी हा मान भारताकडे परतला आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा हा तिसरा विजय आहे. याआधी भारतासाठी १९९४ मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेन हिने पहिला मिस युनिव्हर्स ‘किताब जिंकला होता. यानंतर २००० साली अभिनेत्री लारा दत्ता भूपती हिने भारताला मिस युनिव्हर्स किताबाने गिरवले होते. यानंतर आता हरनाजचा विजय हा अभिमानास्पद असल्याचे या दोघीनी म्हटले आहे आणि तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

आजपासून २७ वर्षांपूर्वी १९९४ सालामध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी सुष्मिता सेन ही पहिली भारतीय होती. दरम्यान ती फक्त १८ वर्षांची होती. यानंतर सुष्मिता बॉलिवूड अभिनेत्री बनली आणि तिने बीवी नंबर १, मैं हूं ना, फिल्हाल आणि सिर्फ तुम यासारख्या एकापेक्षा एक कमाल चित्रपटांमध्ये काम केले आणि आज तिची वेगळी अशी ओळख आहे.

आज तिनेही आनंदित होऊन हरनाजचे कौतुक केले आहे आणि तिचे अभिनंदन करीत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये सुष्मिता सेनने लिहिले, # येह बात ‘हर हिंदुस्तानी की नाज’ हरनाज कौर संधू # Miss Universe 2021 भारताला तुझा खूप खूप अभिमान आहे!!!! अभिनंदन!!!!!! हरनाज संधू!!! भारताचे इतके सुंदर प्रतिनिधित्व केल्याबद्दल धन्यवाद!! तू सगळ्यांच्या मनांवर राज्य करू शकतेस !! #जयहिंद

अभिनेत्री सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा मानांकित किताब भारताकडे आणल्यानंतर ६ वर्षांनी लारा दत्ताने २००० सालामध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला आणि पुन्हा एकदा भारतामध्ये हर्षोल्लास झाला. यानंतर लाराने २००३ सालामध्ये रिलीज झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि स्वतःची अशी विशेष ओळख निर्माण केली. या चित्रपटात अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांनीही काम केले होते.

तर इंस्टाग्रामवर एक पोस्टकारीत लाराने लिहिले, माझी प्रिय @ harnaazsandhu_03, काल जेव्हा मी तुझ्याशी बोलले, तेव्हा तू मला वचन दिलेस की ‘जॆ होईल ते योग्य होईल’!! तुम्ही तुमच्या सर्व विजयी वैभवाचे मूल्यवान आहात आणि बरेच काही!! तुझा स्वतःवर अढळ विश्वास होता आणि फक्त तुला माहीत आहे, तुझा जन्म यासाठीच झाला होता!! मी मिस युनिव्हर्स जिंकले त्या वर्षी तुझा जन्म झाला होता!!! तु भारतासाठी तो मुकुट आणशील आणि पुन्हा एकदा आम्ही मान उंचावण्याची किती दिवस वाट पाहत होतो!! कदाचित, ते नशिबी आले होते!! मला माहित आहे की तु काय आहे आणि मी तुला गौरवशाली भविष्यासाठी शुभेच्छा देते!! तु ज्या उंचीचा मान मिळवशील त्याची ही सुरुवात असू दे! देव तुला आशीर्वाद देवो, तुझे पालक आणि कुटुंब यांचे मनापासून अभिनंदन! ब्रह्मांड आता, तुझ्यासाठी शिंप आहे – आमचा तारा!

यानंतर थेट २०२१ मध्ये अर्थात २१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हरनाज संधूने भारताला तोच मान मिळवून दिला आहे. यासाठी लारानेही तिच्यावर कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले कि, अभिनंदन हरनाज संधू !!!! मंडळात स्वागत आहे!!! यासाठी आम्ही २१ वर्षे वाट पाहिली !!! तू आम्हाला खूप खूप अभिमानास्पद केले आहेस !!! अब्जावधी स्वप्ने पूर्ण होवो !!! @ MissDivaOrg @ विश्वसुंदरी