Take a fresh look at your lifestyle.

‘मिस युनिव्हर्स 2021’ हरनाज संधूचे ‘या’ अभिनेत्रीसोबत आहे खास कनेक्शन; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तब्बल २१ वर्षांनी भारताकडे मिस युनिव्हर्स हा मानाचा ‘किताब पुन्हा एकदा परतला आहे. या मानाचा समजलया जाणाऱ्या ‘मिस युनिव्हर्स’ किताबाला भारताकडे ओढून आणणाऱ्या चंदीगडच्या हरनाज संधूच जगभरातून कौतुक केले जात आहे. सर्व स्तरांतून हरनाजचे विशेष कौतुक केले जात आहे. हरनाजने ‘मिस युनिव्हर्स’चा ताज जिंकला आणि हा ताज जिंकल्यानंतर तिने सगळ्यात पहिला फोन केला तो अभिनेत्री उपासना सिंगला. होय. उपासना सिंग. याचे कारण असे कि हरनाज आणि उपासना यांचं फार खास असं कनेक्शन आहे. अभिनेत्री उपासना सिंग या कपिल शर्माच्या शोमध्ये ‘बुआ’चे पात्र साकारताना दिसल्या होत्या.

 

दरम्यान ‘इंडिया टुडे’ला मुलाखत देताना खुद्द अभिनेत्री उपासना सिंग यांनीच या पहिल्या कॉलबद्दल खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ‘इस्रायलला मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाण्याआधी हरनाज काही दिवस माझ्यासोबत राहिली होती. एकदा तिने माझ्यासाठी राजमा चावल केला होता. मी मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकणार, असं ती मला मोठ्या आत्मविश्वासानं म्हणायची आणि तिनं ही गोष्ट खरी ठरवली. आज ताज जिंकल्यानंतर तिने पहिला कॉल मला केला होता आणि मी माझा शब्द खरा करून दाखवला, असं ती ओरडून ओरडून मला सांगत होती.

पुढे, तिचा आनंद मला जाणवत होता. तिच्यासोबत बोलल्यानंतर मी सुद्धा भावुक झाले होते. खरच अगदी अश्रू अनावर झाले होते. हरनाज जेव्हा केव्हा मुंबईत येते, ती माझ्याकडे मुक्कामाला असते. अगदी मिस इंडियानंतरचं तिचं जेव्हा ट्रेनिंग सुरू झालं तेव्हा देखील ती ५ दिवस आमच्यासोबत होती.

इस्रायल वरून भारतात आल्यानंतरही ती सर्वप्रथम माझ्या घरी येणार आहे.’ सध्या सोशल मीडिया असो, वा अन्य कोणतेही क्षेत्र सगळीकडे हरनाज झळकताना दिसत आहे. एक भारतीय म्हणून प्रत्येकाला तिचा गर्व आहे अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया प्रत्येक पोस्टवर दिसून येत आहेत.