Take a fresh look at your lifestyle.

मिस्टर मम्मी! रितेश- जिनिलियाची गुड न्यूज ऐकली का?; सोशल मीडियावर दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या लग्नाचा १० वा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. यानंतर अगदी काहीच तासांत या दोघांनी आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. त्यांनी दोघांनीही आपल्या अधिकृत सोशल मीडियाच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे. हि बातमी आहे त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा आणि पोस्टर रिलीज. काय? तुम्हाला काय वाटलं? जिनिलिया प्रेगनेंट आहे? छे ओ! यावेळी जिनिलिया नाही रितेशप प्रेगनंट आहे. पण खऱ्या लाईफ मध्ये नाही तर रील लाईफमध्ये. होय. त्यांच्या आगामी चित्रपटाचे कथानक काहीसे असेच कॉमेडी आहे. या चित्रपटाचे नाव ‘मिस्टर मम्मी’ असे आहे.

मिस्टर मम्मी या चित्रपटाचे मजेशीर कॉमेडी असे पोस्टर रितेश आणि जिनिलिया या दोघांनीही शेअर केले आहे. या पोस्टर मध्ये चक्क रितेश प्रेगनेंट असल्याचं दिसतंय. हे फोटो पाहून अनेकांना आश्चर्य वाटेल म्हणून जिनिलियाने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं कि, हा एक भन्नाट कॉमेडी सिनेमा आहे. ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनतर रितेश – जिनिलिया हे दोघे एकत्र एकाच प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहेत. मुख्य म्हणजे अशीही त्यांची जोडी कमाल आणि धमाल आहेच. पण या कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणार हे नक्की आहे. याआधी त्यांनी एकत्र रोमॅन्टिक चित्रपट केले होते मात्र आता पहिल्यांदाच ते एकत्र कॉमेडी करताना दिसणार आहेत.

जिनिलिया आणि रितेश यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आपल्या चाहत्यांना हि बातमी दिली आहे. यात जिनिलियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, “तुम्ही याआधी कधीही न पाहिलेली, पोट धरून हसायला लावणारी अफलातून कॉमेडी तुम्हाला या सिनेमात पहायला मिळणार आहे”. तर रितेशने लिहिले कि, “लवकरच एक कॉमेडी चित्रपट तुमच्या भेटीला येतोय. त्यामुळे खळखळून हसण्यासाठी तयार राहा”. याआधीच जिनिलियाने एका मुलाखतीत सांगितले होते कि, ती आणि रितेश लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्यानंतर आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटात विनोदाची परिपूर्ण अनुभुती आहे. गुलशन कुमार आणि टी-सिरीज यांचा हा चित्रपट भन्नाट कॉमेडी आहे. तर टी-सीरीज् फिल्म्स आणि हेक्टिक सिनेमा प्रायव्हेट लिमिटेड यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.