Take a fresh look at your lifestyle.

बॉलीवूड मधील ‘या’ बड्या अभिनेत्याच्या मुलावर बलात्कार आणि फसवणुकीचा आरोप

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या मुलावर आणि पत्नीविरोधात बलात्कार व फसवणूक केल्याप्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ‘इंडिया टीव्ही’नुसार, एका पीडितीने महाक्षयवर बलात्कार, फसवणूक आणि जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. तक्रार करणारी महिला भोजपुरी सिनेमात काम करत होती.

तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ पासून पीडित तरुणी आणि महाक्षय एकमेकांना डेट करत होते. याच दरम्यान महाक्षय उर्फ मेमोने २०१५ मध्ये पीडितेला त्याच्या घरी बोलावलं व तिला शितपेयातून नशेच्या गोळ्या दिल्या. तसंच तिच्यावर बलात्कार केला. इतकंच नाही तर त्याने तिला लग्नाचं आमिषदेखील दाखवलं. या काळात त्याने वारंवार तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित तरुणी गर्भवती राहिली. मात्र, त्यानंतर मेमोच्या आईकडून पीडितेला गर्भपात करण्याची धमकी मिळाल्याचं पीडितेने सांगितलं.

पीडितेने पुढं सांगितलं की, रिलेशनशिपदरम्यान ती गर्भवती झाली होती. ज्यानंतर तिचा बळजबरीने गर्भपात करण्यात आला. पीडितेने जेव्हा आरोपीवर लग्नासाठी दबाव टाकला तर त्याने कथितपणे लग्नपत्रीका जुळत नसल्याचं कारण सांगितलं. त्यानंतर लग्नाचा विषय काढल्याने आरोपीच्या आईने पीडितेला धमकी दिली होती. ओशिवरा पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.