Take a fresh look at your lifestyle.

राकेश मौर्याला मनसे स्टाईल धडा शिकविणार; राजू साप्तेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजच्या दिवसातील अत्यंत वाईट घटना म्हणजे मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय असे कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला आहे. पुण्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त असून त्यांनी तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडीओ बनविला होता. या व्हिडीओत त्यांनी आत्महत्येचे कारण स्पष्ट केले होते. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला. यानंतर आता मनसे चित्रपट कर्मचारी सेना चांगलीच आक्रमक झाली असून, साप्ते यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकविणार असे स्पष्ट करण्यात आले आहे.

मनसे चित्रपट कर्मचारी सेना राज्य उपाध्यक्ष रमेश परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ राजू साप्ते यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गेले असताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बनविण्यात आला आहे. सरम्यान युनिअन संबंधित काही लोक भेटली असता त्यांनी विविध खुलासे केले आहेत. दरम्यान युनिअल मधील एका व्यक्तीकडून असे समोर आले कि, राजू साप्ते राकेश मौर्याकडे मीटिंगला गेले होते. तिथे त्यांच्याकडे पैशाची मागणी झाली. मौर्या नेहमी लिहून देत असे कि, या या ठिकाणी काम झाले आहेत इतक्या ठिकाणी काम झाले आहे. तर २०१६ सालापासून जिथे जिथे काम झालं आहे त्याचे पैसे युनिअनमध्ये यायला हवे, अशी जबरदस्ती मौर्या साप्तेना करत होता. मात्र मात्र त्यांनी पैसे वाडकरांना दिले होते त्याचे कॅश व्हाउचरदेखील आहे आणि त्यावर त्यांची सही सुद्धा आहे.

यानंतर युनिअन संबंधित रंगराव चौगुले म्हणाले, कुणीही इतक्या वारशाचे कामगारांचे पैसे ठेवत नाही. त्यामुळे हा खोटेपणा आहे. अर्थात हे लोक साप्तेनकडून जबरदस्तीने पैसे मागून त्यांना त्रास देत होते कि युनिअनमध्ये जबरदस्तीने पैसे आले पाहिजे आणि पदाचा दुरुपयोग करणारे राकेश मौर्या, गंगेश्वर श्रीवास्तव, अशोक दिघे हे यात सामील आहेत. यांनी मराठी माणसाला जेरीस करून सोडले आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुळात हे लोक बॉलिवूडशी संबंधित असून नेहमीच मराठी कलाकारांना त्रास देतात.

पुढे परदेशी म्हणाले, या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगतो, कि पोलीस प्रशासन संबंधितांना शिक्षा करेल. पण राजू भाऊंना हे करायला जे लोक कारणीभूत ठरले त्यांना घरातून बाहेर काढून कपडे काढून आम्ही मनसेवाले लोक मारणार. तशीही मनसे बदनाम आहे. पण मराठी लोकांच्या हक्कासाठी आम्ही बदनाम सुद्धा होऊ आणि केसेस सुद्धा अंगावर घेऊ. परत एकदा सांगतो महाराष्ट्रात माज फक्त मराठी माणसाचाच चालला पाहिजे, जर अशी घटना कुणाबाबतीत होत असेल तर जो कुणी जवळचा मनसेचा पदाधिकारी असेल त्याच्यापर्यंत हि बाब पोचवा. प्रत्येकवेळी कुणी गेलं कि आपण जागे होतो आणि पुन्हा झोपी जातो. आजची हि बाब आंदोलनाची सुरुवात आहे. हि घटना परत कुणासोबत घडू नये याची काळजी आपण घयायला पाहिजे.

 

फेडरेशनच्या माध्यमातून खंडणीच्या या नव्या प्रकारची जी काय सुरुवात झाली आहे त्याचा असा त्रास कुणालाही झाला तर आम्हाला संपर्क साधा आम्ही मदत करणार. मान्य करतो जागा योग्य नाही मात्र फेडरेशनचे लोक इथे भेटले म्हणून हा व्हिडीओ करणे गरजेचे वाटले आणि जे लोक मला सकाळपासून काय विषय आहे? असे विचारत आहेत त्यांनी जरा लाज बाळगा. आपल्या क्षेत्रातील कुणीतरी गेलय याची चाड असुद्या. पण काहीही झालं तरी राजू भाऊला न्याय आम्ही मिळवून देणारच. असे म्हणून रमेश परदेशी यांनी साप्ते यांच्या कुटुंबियांना आश्वासित केले आहे.