हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रायगड, रत्नागिरीसह कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे आलेल्या पुरामुळे लोकांनी आपली माणसं, संसार आणि घर डोळ्यासमोर वाहताना पहिली आहेत. या परिस्थतीत पूरग्रस्तांच्या डोळ्यांतील अश्रू, आप्तांना गमावलेल्यांचा टाहो अगदी मन हेलावणारा आहे. दरम्यान शासनासोबत अनेक स्वयंसेवी संस्था, स्थानिक रात्रंदिवस या भागांत कार्यरत आहे. पण बॉलिवूड मात्र शांत? राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला ट्वीटसुद्धा करावं वाटत नाही, अशा शब्दांत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना थोडं संवेदनशील बना, असं आवाहन केलं आहे
इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेकजण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं. अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदतकार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटतायत. अशावेळी माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बड्या बॉलिवूड ताºयांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदतकार्याला हातभार लावावा असं जाहीर आवाहन करतो, असं अमेय खोपकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दरम्यान कोकणातील पूर परिस्थती पाहून मराठमोळा अभिनेता व कोकण पुत्र भरत जाधव याने आपल्याकडून लोकांना मदतीचे आवाहन केले आहे. भरत जाधवने त्याच्या इंस्टाग्राम सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट शेअर करीत लिहिले कि, ‘युथ फॉर डेमॉक्रसी’. अशा प्रकारे तरुणाईला आणि नेटीझन्सला कोकणाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे त्याने आवाहन केले आहे. आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात, जास्त दिवस टिकतील असे सुके पदार्थ (सुका मेवा, फरसाण, वेफर्स, बिस्कीट, खजूर). कुटुंबातील महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, जीवनावश्यक वस्तू, अंथरून-पांघरुण देण्यासाठी भरत जाधवने मदतीची हाक दिली आहे.
Discussion about this post