हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| देशातील महत्वाच्या अशा तीन कृषी कायद्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. मोदी सरकारच्या या निर्णयावर अभिनेत्री कंगना राणावत हिने संताप व्यक्त केला आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय दुःखद आणि लज्जास्पद आहे. मोदी सरकारचा हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आहे. संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन, असे कंगना हिने म्हंटले आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत इंस्टाग्राम पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. तिने म्हंटले की, संसदेत निवडून आलेल्या सरकारच्या बदल्यात रस्त्यावरचे लोक कायदे करू लागले तर ते जिहादी राष्ट्र आहे. ज्यांना हे हवे होते त्या सर्वांचे अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. आम्ही शेतकऱ्यांना पटवून देऊ शकलो नाही, आमची तपश्चर्या कमी होती, त्यामुळे आम्हाला हा कायदा मागे घ्यावा लागला आहे.
Discussion about this post