Take a fresh look at your lifestyle.

मनी हाईस्ट 5’चा अॅक्शन टिझर रिलीज; साथीदारांसाठी प्रोफेसर कोणत्या थराला जाणार?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मनी हाईस्ट 5 नेटफ्लिक्सवरील अत्यंत लोकप्रिय शो असून आता त्याच्या शेवटच्या भागाचा टीजर रिलीज झाला आहे. या शेवटच्या भागाच्या पहिल्या पर्वात अर्थात सीझन 5 नेटफ्लिक्सवर आला आणि दुसऱ्या भागाच्या रिलीजची तारीख आधीच सांगितली गेली. आता या भागात अर्धी राहिलेली कथा पूर्ण होणार ते हि अगदी थरारक. सध्या नेटफ्लिक्सने यूट्यूबवर ‘मनी हाईस्ट 5’च्या दुसऱ्या भागाचा छोटा टीझर रिलीज केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी आपली उत्सुकता व्यक्त केली आहे.

नेटफ्लिक्सने या सीरीजचा टीझर आधी स्पॅनिश आणि नंतर अन्य भाषांमध्ये रिलीज केला. हा टीझर केवळ ३१ सेकंदांचा आहे. मात्र इतका हटके आहे कि बस्स.. या टीझरची सुरुवात प्रोफेसरच्या सहकाऱ्यांच्या निराशेने भरलेल्या चेहऱ्याने आणि प्रोफेसरच्या आवाजापासून होते. प्रोफेसर म्हणतात, “गेल्या काही तासांत मी माझ्या जवळच्या दोन लोकांना गमावले. आता मी या चोरीमुळे इतर कोणालाही मरू देणार नाही.” एकंदरच या टीझरमध्ये हे स्पष्ट होतेय की पहिल्या भागात फक्त अॅक्शन सीन्स होते पण आता होणार खरी चहल.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by MONEY HEIST (@moneyhiest.netflix)

या शॉर्ट टीझरमधील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आता पडद्यामागील सूत्रधार अर्थात प्रोफेसर बुद्धीसह ताकदीने लढताना दिसतील. प्रेक्षकांनी या सीरीजदरम्यान प्रोफेसरला फक्त बुद्धीच वापरताना पाहिले होते पण आता या टिझरनंतर प्रोफेसर आक्रमक भूमिकेत दिसेल अशी आशा नाकारता येत नाही. प्रोफेसर आपल्या टीममधील सदस्यांना वाचवण्यासाठी आता कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे. त्यामुळे हा शेवटचा थरार नक्की पहा. हे पर्व ३ डिसेंबर २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. ही सीरीज स्पॅनिश, हिंदी, इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.