Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बच्चन पांडे’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक निर्माते आणि दिग्दर्शक एकामागे एक धमाकेदार चित्रपट घेऊन रिंगणात उतरताना दिसत आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने तर अगदी लॉकडाऊन पासून जणू मनोरंजनाचे धमाके साठवून ठेवले होते. बेलबॉटम, सूर्यवंशी, अतरंगी रे असे एकापेक्षा एक हटके चित्रपट दिल्यानंतर आता लवकरच त्याचा आगामी चित्रपट ‘बच्चन पांडे’देखील रिलीज होण्याच्या वाटेवर आहे. अलीकडेच अक्षय कुमारचा चित्रपटातील लूक समोर आला होता. अक्षयचा हा लूक पाहून चाहते या चित्रपटाबाबत फारच उत्सुक झाले होते. यानंतर आता चित्रपटाचे नवे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात अॅक्शन आहे. कॉमेडी आहे. रोमान्स आहे आणि ड्रामा तर विचारूच नका. येत्या होळीच्या मुहूर्तावर म्हणजेच १८ मार्च २०२२ रोजी संपूर्ण राज्यातील चित्रपटगृहांमध्ये ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, या आशयाचे ट्विट अक्षयने केले आहे. तसेच या ट्विटमध्ये अक्षयने चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. यापूर्वी हा चित्रपट २६ जानेवारी २०२२ रोजी रिलीज होणार होता. पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा हा चित्रपट अत्यंत बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. कारण यातील अक्षयचा लूक फारच लक्षवेधी आणि वेगळा आहे. आता हा चित्रपट होळीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यातून एक वेगळे कथानक पहायला मिळणार आहे. येत्या १८ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. बच्चन पांडे या चित्रपट अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्याच्यासह अभिनेत्री क्रिती सेनॉन महिला मुख्य भूमिकेत स्क्रीन शेअर करत आहे. तसेच यामध्ये अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.