Take a fresh look at your lifestyle.

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा बहुप्रतीक्षित ‘राधेश्याम’ 11 मार्चला होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सुपरस्टार बाहुबली फेम अभिनेता ‘प्रभास’ हा आपल्या जबरदस्त अभिनयामुळॆ प्रेक्षकांच्या घराघरात आणि मनामनांत वसला आहे. बाहुबली चित्रपटातील दर्जेदार भूमिकेनंतर प्रभास हा तरुण तरुणींचा लाडका अभिनेता बनला आहे. त्यामुळे प्रभासच चाहता वर्ग हा अत्याधिक युथ आहे. प्रभास सोशल मीडियावर फार सक्रिय नसला तरीही तो आपल्या आगामी चित्रपट वा प्रोजेक्टबाबत सोशल मीडियावर माहिती देताना दिसतो. त्याचा चाहता वर्ग त्याला नेहमीच फॉलो करीत असल्यामुळे त्याच्या आयुष्यात काय घडत आहे याबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. यानंतर आता प्रभासचा बहूप्रतिक्षित चित्रपट राधेश्याम’साठी मुहूर्त सापडला आहे. येत्या ११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘बाहुबली’ या दाक्षिणात्य चित्रपटातून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर अभिनेता प्रभास याचा राधेश्याम प्रेक्षकांचे मनोरंजन करणाया सज्ज आहे. इतकेच नव्हे तर या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे प्रभाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राधेश्याम हा चित्रपट राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित आहे. अर्थात युथ साठी नक्कीच खास. या चित्रपटात प्रभास विक्रमादित्य नामक लव्हर बॉयची भूमिका साकारतो आहे. तर पूजा प्रेरणा नामक सुंदर तरुणीची भूमिका साकारते आहे. या चित्रपटात नायक नायिकेचे नशीब त्यांना कसं एकत्र आणतं हे दाखवण्यात आलं. त्यामुळे चित्रपटाची कथा एकंदरच डेस्टिनी आणि लव्ह अर्थात नशीब आणि प्रेमावर आधारित आहे.

याआधी हा चित्रपट कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या निर्बंधांच्या बंधनात अडकला होता. परिणामी त्याची रिलीज डेट वारंवार बदलत होती. यानंतर आता अभिनेता प्रभास याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून आपल्या आगामी बहुप्रतीक्षित ‘राधेश्याम’ या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केली आहे. त्याने नव्या डेटसोबत राधेश्यामचे पोस्टरदेखील शेअर केले आहे. त्यात ‘राधेश्याम’ हा चित्रपट ११ मार्च २०२२ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्याने सांगितले आहे. या चित्रपटामध्ये प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर हे कलाकार देखील अन्य महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.