Take a fresh look at your lifestyle.

‘गडद’ पाण्याच्या आत शूट होणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचे पोस्टर रिलीज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीत एक वेगळा प्रयोग घेऊन एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे नावदेखील अगदी वेगळे आणि लक्षवेधी आहे. ‘गडद’ असे शीर्षक असलेला हा चित्रपट अंडरवॉटर शूट केलेला पहिला मराठी चित्रपट असून लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ‘गडद’ या चित्रपटाचे लक्ष वेधून घेणारे हटके मोशन पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले असून ते सोशल मीडियावर चर्चेत आहे. याप्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.

 

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि. च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद’ या चित्रपटाची निर्मिती आहे. तर दिग्दर्शक प्रज्ञेश कदम या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत आणि लेखनही त्यांनीच केले आहे. प्रज्ञेश यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. याचे शूटिंग मालदिव आणि गोव्यात सुरु होणार आहे. तूर्तास चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांची या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवित आहे.

 

या चित्रपटात मिताली मयेकर, सुयोग गोऱ्हे, शुभांगी तांबाळे, नितीन गावंडे हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. अभिषेक खणकर यांनी ‘गडद’ चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून, आदिनाथ पोहनकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. तर सुरेल संगीत देण्याची जबाबदारी रोहित श्याम राऊतची आहे. तसेच सिनेमॅटोग्राफीची धुरा वेंकटेश प्रसाद सांभाळत आहेत. याशिवाय मंदार लालगे आणि नितीन गावंडे या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्युसर आणि प्रवीण वानखेडे कार्यकारी निर्माते आहेत.