Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

देऊनी डफावर थाप… अर्पितो तुम्हाला तुमचे, ‘महाराष्ट्र शाहीर’; मोशन पोस्टरने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 15, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Maharashtra Shahir
0
SHARES
72
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांचा आगामी बहुचर्चित चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’ कधी प्रदर्शित होतो याकडे अख्खा महाराष्ट्र डोळे लावून बसला आहे. हा चित्रपट महाराष्ट्राचे लाडके शाहीर.. कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित असून या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येकात एक विशेष आणि वेगळीच उत्सुकता निर्मांण झाली आहे. अशातच आता या चित्रपटाचे नवेकोरे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. जे अगदी तासाभरातच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

या नव्या टीझर व्हिडीओमध्ये महाराष्ट्र शाहीरचे नवे आणि अत्यंत लक्षवेधी पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागले आहे. नेटकऱ्यांनी या नव्या पोस्टरला विशेष पसंती दिली आहे. एका घट्ट दगडी मुठीवर महाराष्ट्राचे लाडके शाहीर यांच्या भूमिकेतला अभिनेता अंकुश चौधरी साद घालताना या पोस्टरमध्ये दिसत आहेत. एक हात कानाला आणि दुसरा सुरांच्या दिशेने…. तर मागे फडकणारा भगवा काळजाचा ठोका चुकवतो आहे. हे पोस्टर अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आले असून या पोस्टरचा नेमकेपणा कौतुकाचा विषय ठरतो आहे.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedaarshinde)

हे मोशन पोस्टर शेअर करताना केदार शिंदे यांनी कॅप्शनही अगदी उठावदार दिले आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये हिले आहे कि, ‘फडकेल नव्याने भगवा.. महाराष्ट्र पुन्हा गर्जेल.. जनतेचा बुलंद आवाज.. लेखणीतूनी बरसेल.. देऊनी डफावर थाप.. ललकारत होते जाहीर.. अर्पितो तुम्हाला तुमचे.. तुमचाच.. महाराष्ट्र शाहीर.. शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात..’ या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत पोस्टरचे स्वागत आणि चित्रपटाबाबत असणारी उत्सुकता दर्शवली आहे.

Tags: Ankush ChoudhariInstagram PostKedar shindeMaharashtra ShahirViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group