Take a fresh look at your lifestyle.

मौनी राॅयने तापवलं इंटरनेटवरचं वातावरण; लग्नाआधीचे HOT बिकीनी फोटो पहाच

0

हॅलो बाॅलिवुड आॅनलाईन : विकी कौशल-कतरिना कैफ, अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यानंतर आता अभिनेत्री मौनी राॅय लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मौनीचे लग्नाआधीच यलो बिकिनी मधील हाॅट फोटोशूट व्हायरल झालेय. यामुळे सोशल मिडियावरील वातावरण तापलं आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘नागिन’ म्हणजेच अभिनेत्री मौनी रॉय आजपासून १५ दिवसांनी सूरज नांबियारसोबत लग्न करणार आहे. बातमीनुसार, लग्नाची तयारीही पूर्ण झाली आहे. सर्व काही फायनल झाले आहे.

अनेक दिवसांपासून मौनी रॉयच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या. अभिनेत्रीचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकरने एका मुलाखतीत सांगितले होते की, मौनी २०२२ मध्ये लग्न करणार आहे. असे सांगितले जात होते की अभिनेत्री दुबईमध्ये लग्न करेल जिथे तिचा भावी पती सूरज राहतो, परंतु नवीन माहितीनुसार, अभिनेत्री गोव्यात लग्न करणार आहे.

गोव्यात पार पडणार आहे लग्न

मौनीच्या लग्नासाठी गोव्यात एक पंचतारांकित रिसॉर्ट बुक करण्यात आला असून पाहुण्यांना आमंत्रणेही पाठवण्यास सुरुवात केली असल्याचे समजते आहे. लग्नाला येणार्‍या सर्व पाहुण्यांना त्यांचे लशीचे प्रमाणपत्र सोबत आणावे लागेल. लग्न दिवसा पार पडणार आहे. लग्नानंतर, २८ जानेवारी रोजी एका डान्स पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे जेथे वधू आणि वर त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह साजरा करतील. पाहुण्यांबद्दल सांगायचे तर, चित्रपट निर्माता करण जोहर, एकता कपूर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​आणि टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडिया मौनी आणि सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात.

मौनी रॉय दिसणार ब्रह्मास्त्रमध्येमार्च २०२१ मध्ये मौनी रॉयची आई सूरज नांबियारच्या पालकांना भेटल्याचे वृत्त समोर आले होते. ही भेट अभिनेत्री मंदिरा बेदीच्या घरी झाल्याचे बोलले जात होते, ज्यामध्ये मौनी रॉयचा भाऊही उपस्थित होता. मंदिरा बेदी आणि मौनी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, मौनी लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.