Take a fresh look at your lifestyle.

लता दीदींच्या निधनाने जगभरात दुखवटा; शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांच्या सुमारास निधन झाले आहे. हि बातमी संपूर्ण जगभरची अत्यंत शोकाकुल करणारी बातमी आहे. लता दीदी गेल्या महिन्याभरापासून कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल होत्या. दरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला आणि संपूर्ण जगाचा निरोप घेतला. यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी, संगीत सृष्टी आणि अगदी राजकीय स्तरावरही शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान लता दीदींच्या अंत्य दर्शनासाठी अनेक चाहत्यांची लाट उसळण्याची शक्यता आहे. माहितीनुसार लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार होणार आहेत.

लता दीदींचे पार्थिव दुपारी १२.३० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या घरी प्रभुकुंज येथे अंत्य दर्शनासाठी घेऊन जाण्यात येईल. यानंतर १२.३० ते ३ वाजेपर्यंत लता दीदींचे पार्थिव शिवाजी पार्क येथे त्यांच्या चाहत्यांना अंतिम दर्शन घेता यावे म्हणून ठेवण्यात येईल. पुढे संध्याकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास लता दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्य संस्कार पार पडतील. लता दीदींच्या निधनाची बातमी संपूर्ण जगभरातील चाहत्यांसाठी शोकाकुल करणारी आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर एव्हाना गर्दी केली असून टाहो फोडताना दिसत आहेत.

 

लता दीदी या खऱ्या अर्थाने स्वर सम्राज्ञी होत्या. संगीत सृष्टीला एक नवी आणि वेगळी ओळख निर्माण करून देणारी स्वरांची सरस्वती म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या सुमधुर आवाजाने त्यांनी ५० हजारांहून अधिक गाणी गेली होती. त्यांचा चाहतावर्ग कोट्याही विशिष्ट वयाचा नव्हता. मात्र प्रत्येक वयातील प्रत्येक व्यक्ती त्यांची चाहती होती. प्रेम, माया, वात्सल्य अश्या प्रत्येक सगुणांची खाण म्हणजे लता दीदी. लता दीदींचे निधन हि बातमी अत्यंत शोकमय आणि काळजात चर्रर्र करणारी आहे. लता दीदींचे स्वर युगाशी एक वेगळे नाते आहे जे नाते अमर आहे. त्यामुळे लता दीदींचे अस्तित्व हे जगरामरर आहे.
लता मंगेशकर यांचा भावपूर्ण श्रद्धांजली!