हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या महाराष्ट्रभर ‘वाळवी’ लागली असून प्रेक्षकांकडूनही या ‘वाळवी’ला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ चित्रपटाला समीक्षकांनीही पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या ‘वाळवी’चाच बोलबाला आहे. नुकतीच ‘वाळवी’च्या टीमने ठाण्यात आयोजित झालेल्या ३३ व्या रोड सेफ्टी वीकमध्ये हजेरी लावली.
हा कार्यक्रम १५ जानेवारी २०२३ रोजी तलावपाळी या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी वाळवी चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेले कलाकार अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री अनिता दाते आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांनी बाईक रॅलीचे उद्घाटन केलं.
परेश मोकाशी दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज निर्मित ‘वाळवी’ या चित्रपटाची भुरळ संपूर्ण सिनेसष्टीला पडली असून अनेक कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. काहींनी माध्यमांशी संवाद साधताना तर काहींनी या चित्रपटासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करून कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘वाळवी’ची खासियतही काही कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. एकंदरच लाकूड पोखरणारी ही ‘वाळवी’ सगळ्यांची मनं जिंकताना दिसते आहे.
गेल्या आठवड्यात १३ जानेवारी २०२३ रोजी ‘वाळवी’ हा र_हास्यपट सर्वत्र राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित या चित्रपटात सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अनिता दाते, शिवानी सुर्वे, नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तर मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी चित्रपटाचा कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट असून प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवताना दिसतो आहे.
Discussion about this post