व्हायरल झाला रे..; मिस्टर अँड मिसेस नारकरांचा ‘कच्चा बदाम’वर भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘कच्चा बादाम’ हे एक बंगाली गाणे असून सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. याचा प्रत्यय सोशल मीडिया युजर्सला आलाच असेल. कारण इंस्टाग्राम असो किंवा मग फेसबुक. फक्त चालू करायचा उशीर. जो तो ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर रील्स बनवताना दिसतोय. अगदी नेटिझन्सपासून मोठमोठे सेलिब्रिटीजसुद्धा या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय जोडी अविनाश नारकर आणि पत्नी ऐश्वर्या नारकर यांनीदेखील या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांच्यासोबत या व्हिडिओमध्ये अश्विनी कासर देखील दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
View this post on Instagram
कच्चा बदाम हे गाणे सोशल मीडियावर इतके ट्रेंडिंग होत आहे कि, प्रत्येक रिलमागे कच्चा बदाम वर कुणी ना कुणी बनविलेले रिल्स दिसतात. त्यामुळे या गाण्याची भुरळ सगळ्यांना पडली आहे. अनेक कलाकार या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील हटके कपलं ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनीसुद्धा या गाण्यावर कमाल डान्स केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत तर अनेकांनी या कपलंचं भरपूर कौतुक केलं आहे. या वयातही किती एन्जॉय करत आहेत असे अनेक युजर्स म्हणाले.
सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असणारे ‘कच्चा बादाम’ हे गाणे कोणा प्रख्यात गायकाने गायलेले नाही. तर रस्त्यावर शेंगदाणे विकणाऱ्या एका सामान्य माणसाने हे गाणे गेले आहे. ज्याचे नाव भुबन बड्याकर असे आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात भुबन हातगाडीच्या सहाय्याने रस्त्यावर ठिकठिकाणी शेंगदाणे विकताना दिसतात. त्याचवेळी कोणीतरी, भुबन यांच्या अनोख्या शैलीत शेंगदाणा विकण्यासाठी गायलेल्या या गाण्याचा व्हिडीओ शूट केला. यानंतर हा व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केला आणि हा व्हिडीओ अपलोड होताच हे गाणे प्रचंड व्हायरल झाले. आता सेलिब्रिटीसुद्धा भुबन यांच्या ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवत आहेत. या गाण्याने भुबन यांचे आयुष्यच बदलले.