Take a fresh look at your lifestyle.

अहो…मिस्टर खरेरा.. तुमची लाडो एक्साइटेड आहे; मानसी नाईकची इंस्टा पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| मराठी सिनेसृष्टीतील लक्षवेधी चेहरा आणि आघाडीची अभिनेत्री जिने बघतोय रिक्षावाला म्हणत अख्ख्या महाराष्ट्राला नाचवल ती म्हणजे मानसी नाईक. मानसी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय दिसते. त्यामुळे भले ती अभिनय क्षेत्रात फारशी सक्रीय नसली तरीदेखील चर्चेत कायम असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मग काय चर्चा तर होणारच ना.. त्यात तिचा चाहता वर्ग फारच मोठा. आताही तिची अशी एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. यात ती आपल्या पतीला स्वतःच्या उत्सुकतेबाबत सांगत आहे. तर ही उत्सुकता कसली आहे हे जाणून घेऊ.

अनेकांना आपल्या अदा आणि मोहक डोळ्यांनी घायाळ करणारी मानसी मिस्टर प्रदीप खरेरा यांना भाळली आणि झाली मिसेस खरेरा. यानंतर सोशल मीडियावर मानसी प्रदिपसोबत सतत फोटो व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे. तिचे चाहतेदेखील या फोटो आणि व्हिडिओना चांगला प्रतिसाद देतात. सध्या हे जोडपं प्रसिद्ध व्हायरल जोडप्यांच्या लिस्टमध्ये आघाडीवर आहे. मानसी आणि प्रदीप यांचा विवाह १९ जानेवारी २०२१ रोजी पार पडला. अर्थातच येत्या १९ तारखेला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे. याचनिमित्त मानसीने इंस्टा पोस्ट करीत पत्नीहट्ट केला आहे.

मानसी नाईकने इंस्टाग्रामवर पती प्रदीप खरेरा सोबतचे काही फोटो शेअर करीत लिहिले की, अहो..! मि. खरेरा. १९ जानेवारी जवळ येते. पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाचे गिफ्ट काय देणार..? तुझी लाडो रानी एक्साइटेड आहे. मानसीच्या या पोस्टवरून एकंदरच लक्षात येतंय की मिस्टर खरेरा यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. काय करणार बाबा.. पत्नीहट्ट आहे ना पुरवावा तर लागणारच.