Take a fresh look at your lifestyle.

मिसेस कौशलच्या शुभेच्छांनी सलमानचा वाढदिवस केला खास; पहा पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोमवारी २७ डिसेंबर रोजी बॉलिवूडचा दबंग अर्थात अभिनेता सलमान खानचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा झाला. यंदा सलमान ५६ वर्षांचा झाला आहे. त्याचा जगभरातील चाहता वर्ग पाहता सोशल मीडियावर त्याचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याचे चाहते जगातील कोपऱ्याकोपऱ्यातून त्याच्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसले. मात्र भाईजानचा वाढदिवस सगळ्यात खास झाला तो त्याची मैत्रीण आणि आताची मिसेस कौशल अर्थात कॅटरिना कैफच्या शुभेच्छांमुळे. कॅटरिनाने इंस्टाग्रामवर पोस्ट करत सलमानला शुभेच्छा दिल्या.

कॅटरिना आणि सलमान दोघे चांगले मित्र आहेत. कॅटरिना विवाहित असली, तरी ती तिच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरलेली नाही. उशिरा का होईना पण तीने सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं. इतकेच नव्हे तर यासोबत एक खास संदेशही दिला आहे. यानंतर कॅटरिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर एगदी तुफान व्हायरल झाली आहे. कॅटरिनाने सलमानचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करीत त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कॅटरिनाने इंस्टाग्राम पोस्टवर सलमानचा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करीत लिहिले की, “हॅपी बर्थडे सलमान खान, तुला खूप आनंद आणि आदर मिळो.”

अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ज्यामध्ये ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘भारत’, ‘मैने प्यार क्यूं किया’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट चांगलेच गाजले आहेत. एवढेच नव्हे तर आता या दोघांचा ‘टायगर ३’ हा चित्रपटही येणार आहे. सलमान खानच्या या घोषणेनंतर पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत आहे.

खाजगी आयुष्याबद्दल म्हणायचे झाले तर याच महिन्यात ९ तारखेला कॅटरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत लग्नगाठ बांधली. तर सलमान ५६ वर्षाचा झाला असला तरीही अजून एलिजिबल बॅचलर आहे आणि जगभरातून अजूनही सलमान लग्न कधी करणार? हा प्रश्न वारंवार विचारला जातो.