Take a fresh look at your lifestyle.

मिसेस मुख्यमंत्री’चे सुमी- पायलट मोठ्ठा पडदा गाजवण्यास सज्ज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘मिसेस मुख्यमंत्री’ या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’ चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. पण. पण. पण. यावेळी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर तुम्ही या दोघांना एकत्र पाहू शकणार आहेत. होय अभिनेत्री अमृता धोंगडे आणि अभिनेता तेजस बर्वे हे मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ असे आहे.

सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा अलीकडेच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला आहे. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशिष कैलास जैन यांनी सांगितले कि, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. ‘दिशाभूल’ मध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.