Take a fresh look at your lifestyle.

‘मिसेस मुख्यमंत्री’मधील सुमी पडली प्रेमात..?; सोशल मीडियावर रंगली चर्चा

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेने काही काळापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र मालिका संपल्यानंतरही मालिकेतील पात्र अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहेत. या मालिकेतील मुख्य पात्र सुमन अर्थातच प्रेक्षकांची लाडकी सुमी आणि खऱ्या आयुष्यातील अमृता धोंगडे प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. मालिकेतील समर पाटील आणि खानावळीची मालकीण सुमी यांच्या प्रेमकहाणीने सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला होता. या मालिकेत सुमीची भूमिका साकारणारी अमृता म्हणे प्रेमात पडलीये.. तिने नुकतीच शेअर केलेल्या पोस्टमुळे ती एका अभिनेत्याच्या प्रेमात पडली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सुमीच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळाल्यानंतर अभिनेत्री अमृता धोंगडे आता सोनी मराठीवरील चांदणे शिंपित जाशी मालिकेत चारुची भूमिका साकारत आहे. याच मालिकेतील अभिनेता अतुल आगलावे याच्यासोबत काही दिवसांपूर्वी अमृताने एक फोटो शेअर करून त्याला वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. इतकेच नव्हे, तर फक्त शुभेच्छा न देता त्यासोबत तिने त्याचे भरभरून कौतुकही केले आहे. यात तिने भली मोठी पोस्ट लिहून म्हटले की, आय लव्ह यू, बी अलवेज विथ मी. तिच्या या पोस्टनंतर त्या दोघांचे अफेयर असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर चांगलीच हवा मिळाली आहे.

अमृता आणि अतुल दोघेही चांदणे शिंपित जाशी या मालिकेत एकत्रित काम करत आहेत. यात अतुल राहुल नामक भूमिका साकारताना दिसत आहे. मालिकेच्या सेटवर त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. अल्पावधीतच दोघांची अगदी घट्ट मैत्री झाली. ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर वरचेवर शेअर करताना दिसतात. हे दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत का? याबाबत सध्या सेटवर आणि चाहत्यांमध्येही चर्चा पाहायला मिळत आहे. अभिनेता अतुल आगलावे मोलकरीणबाई या मालिकेत झळकला होता. त्याने साकारलेली रितीकची भूमिका लोकांना आवडली होती. तू माझा सांगाती या मालिकेतून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तो नशीबवान या चित्रपटात देखील झळकला होता. अमृताने मालिकेत काम करण्यापूर्वी ‘मिथुन’ या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याआधी लहान मोठी कामं केली होती. परंतु खरी ओळख तिला ‘मिथुन’ या चित्रपटातून मिळाली.