Take a fresh look at your lifestyle.

लक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात आहे. अनेक टीका टिप्पणी सहन केल्यानंतर अखेर या नुकताच या चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. चित्रपटाचे नाव ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. त्यानंतर मुकेश खन्ना यांनी आनंद व्यक्त केला.

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ ठेवल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘हे केव्हाच व्हायला हवे होते. मला असे वाटते की सोशल मीडियामुळे अक्षय कुमार आणि त्याच्या टीमला असे करावे लागले असणार. यापुढे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटाचे नाव ठेवताना थोडा विचार करतील. आता सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे हे सर्वांना कळाले आहे’ असे म्हणत मुकेश खन्ना यांनी आनंद व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर लक्ष्मी बॉम्बचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या नावावर टीका केली होती. ‘या चित्रपटाचे शिर्षक लक्ष्मी बॉम्ब ठेवण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती का? माझ्या मते अजीबात नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता का? नाही ना. मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवले?’ असे म्हटले होते. आता चित्रपटाचे नाव बदलताच त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.