महिलविरोधातील ‘त्या’ वादग्रस्त विधानाबद्दल मुकेश खन्ना यांनी दिले स्पष्टीकरण ; म्हणाले की…
हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | महिलांबद्दच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेचे धनी बनलेले प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी अखेर आपल्या त्या वक्तव्या वर स्पष्टीकरण दिलं असून मी नेहमीच महिलांचा आदर करत आलोय अस त्यांनी म्हंटल आहे. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ते महिलांविरोधात वादग्रस्त विधान करताना दिसत आहेत. आता मुकेश खन्ना यांनी त्यांच्या या व्हायरल व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते म्हणाले की, जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो केवळ एक भाग आहे आणि त्या आधारावर चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ते महिलांचा खूप सन्मान करता.
मुकेश खन्ना यांनी लिहिले की, ‘मला खरंच आश्चर्य वाटतं की, माझ्या एका वक्तव्याला फारच चुकीच्या पद्धतीने सादर केलं जात आहे. मी महिलांविरोधात असल्याचं दाखवलं जात आहे. जेवढा सन्मान मी महिलांचा करतो तेवढाच कदाचितच कुणी करत असेल. त्यामुळेच महिला लक्ष्मी बॉम्बच्या नावाचा विरोध केला. मी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. प्रत्येक रेप कांडावर विरोधात मी बोलत आहे. मी हे कधीच बोललो नाही की, महिलांनी काम करू नये. मी फक्त हे बोललो होतो की, मीटू ची सुरूवात कशी होते. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपलं स्थान निर्माण केलं आहे. मग मी महिलांच्या काम करण्याविरोधात कसं बोलू शकतो. अस मुकेश खन्ना म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’