हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओम भुतकर, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी या मराठीतील कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध मराठी सिनेमा मुळाशी पॅटर्न होय. या सिनेमाने महाराष्ट्रात चांगलीच पसंती मिळवली होती. सिनेमागृहात हाऊसफुल्ल झालेल्या या सिनेमाने मराठी प्रेक्षकांचे मन जिकंले आहे. मुळशी भागात शेतजमीनी विकल्यानंतर उद्भवलेली विषण्ण करणारी गुन्हेगारी दुनिया या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी दाखविली आहे. त्यांनी या सिनेमात साकारलेल्या डॉनने तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील कलाकार आणि सिनेमा दोन्ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. आता या सिनेमाचा रिमेक हिंदीमध्ये बनविला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या सिनेमातील आररारारा खतरनाक गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहे. आता हिंदीमध्ये या सिनेमाच्या रिमेकचे नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ’ असे देण्यात आले आहे. यामध्ये उपेंद्र लिमये यांनी साकारलेली पोलिसाची भूमिका सलमान खान करणार असल्याच्याही चर्चा होत आहेत. मराठीतील या सिनेमाचे यश पाहून हा सिनेमा हिंदीत केला जात आहे. यामधील ओम भुतकरची भूमिका सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष्य शर्मा करणार आहे अशी माहिती मिळाली आहे. या सिनेमाचे नाव धाक ठेवण्यात येणार होते. मात्र आता ते बदलले असून ते ‘गन्स ऑफ नॉर्थ’ असे ठेवण्यात येणार आहे.
सिनेमाची पूर्वतयारी झाली आहे. एप्रिल महिन्यात शूटिंग सुरु होणार होते मात्र संचारबंदीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. आता संचारबंदी उठल्यावर ते सुरु होईल. ओम भुतकर व उपेंद्र लिमये यांच्या भूमिका कोण करणार हे ठरले असले तरी प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण साकारणार आहे याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या सिनेमामध्ये प्रवीण तरडे ही समाविष्ट असणार आहेत पण ते नेमकी कोणती जबाबदारी घेणार आहेत हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मराठीतील यशामुळे हिंदीतही या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अनेक आशा असतील.