Take a fresh look at your lifestyle.

‘मुलगी झाली हो’ मालिका बंद होणार..?; चालू चर्चांवर वाहिनीने दिले स्पष्टीकरण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही महिन्यांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका नेहमीच या न त्या कारणामुळे चर्चेत राहिली आहे. अभिनेता किरण माने यांनी नुकतीच या मालिकेविषयी एक पोस्ट लिहिली आणि सगळीकडे खळबळ उडाली आहे. याआधी त्यांना मालिकेतून अचानक काढून टाकण्यात आल्यामुळे वाद झाला होता. यानंतर ३ महिन्यांतच ही मालिका रसातळाला गेल्याचं त्यांनी नव्या पोस्टमध्ये लिहिलं. यामुळे हि मालिका बंद होणार अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. या चर्चांवर आता स्टार प्रवाह वाहिनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

 

स्टार प्रवाह वाहिनीने सांगितले कि, मुलगी झाली हो ही मालिका रात्री नऊ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित व्हायची. मात्र आता त्या जागी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. पण त्यामुळे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका बंद होणार नाही. तर या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे. ही मालिका आता नव्या वेळेत म्हणजेच दुपारी दोन वाजता प्रसारित होईल. किरण माने यांनीही आपल्या पोस्टमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता कि मालिकेला प्राईम टाईममधून काढून टाकले आहे.

मुलगी झाली हो हि मालिका एका काळात अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय होती. त्यामुळे पसंतीच्या रेटिंगमध्ये मुलगी झाली हो हि मालिका आणि स्टार प्रवाह वाहिनी नेहमी १ ते ३ नंबरच्या मध्ये असायचे. पण किरण माने यांच्यासोबत झालेला प्रकार उघडकीस आल्यानंतर अचानक बघता बघता अगदी ३ महिन्यातच मालिकेचे रेटिंग पडले आणि मालिकेचा टीआरपी सुद्धा घसरला.