Take a fresh look at your lifestyle.

आर्यन खानच्या नशिबी आजही कोठडीच..; जामीन याचिकेवर उद्या होणार सुनावणी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वकिलांनी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख १३ ऑक्टोबर निश्चित केली होती. आर्यन खानच्या जामिनावर आज बुधवारी सुनावणी होणार होती. मात्र आज वकिलांचा युक्तिवाद पूर्ण न झाल्याने हि सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे. यामुळे आता आर्यन खानला जामीन मिळणार का नाही? या प्रश्नाचे उत्तर आजच्यापुर्ता पुन्हा एकदा अनुत्तरीतच राहिले आहे.

याआधी महानगर दंडाधिकारी न्यायालयात आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सोमवारी सुनावणी दरम्यान, NCBने या प्रकरणी न्यायालयाकडे १ आठवड्याची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने NCB ला बुधवारपर्यंतची मुदत दिली. या प्रकरणात NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले, “आम्ही आणि फिर्यादी खटला तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. आमचे प्रकरण मजबूत आहे आणि आम्ही ते न्यायालयात सादर करू.”

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर शुक्रवारी आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले होते. आर्यनसह, या प्रकरणात अटक केलेल्या इतर ५ आरोपींनाही आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आले. मुनमुन धामेचासह २ महिला आरोपींना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. या लोकांना कारागृहात कोणतीही विशेष सुविधा मिळणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर.एम. नेर्लीकर यांनी आर्यन, मुनमुन धामेचर आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन याचिका कायम ठेवण्यायोग्य नसल्याचे म्हटले होते.

आर्यन खानकडून भलेही ड्रग्स जप्त केले गेले नसेल, पण त्याच्यासह सर्व आरोपी कटात सामील आहेत. आर्यन खानवर कॉन्ट्राबँडच्या खरेदीसाठी वापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही, तर मर्चंटकडून अमली पदार्थदेखील जप्त करण्यात आले आहे. तसेच, परदेशातील व्यवहारांशी संबंधित तपास केला गेला पाहिजे आणि तो केलाही जात आहे, असे एनसीबीने म्हटले आहे.

सुनावणी दरम्यान युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलाच आणि हा अर्ज कायम ठेवण्यायोग्य नाही असेही स्पष्ट केले होते. गेल्या शनिवारी रात्री मुंबई किनाऱ्यावर गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर या तिघांना काही इतरांसह NCB ने ताब्यात घेतले. या आरोपींकडून अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचा केंद्रीय एजन्सीचा दावा आहे. या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली आहे.