Take a fresh look at your lifestyle.

राज कुंद्राचा कोठडीतील पाहुणचार वाढला; मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील अत्यंत चर्चेत असणारे सध्याचे पोर्नोग्राफिक चित्रीकरण प्रकरण चांगलेच जोरावर आहे. या पॉर्न व्हिडिओ निर्मिती आणि प्रसारण या प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणी आज संपतील उद्या संपतील असे वाटताना त्या काही संपेना. याउलट आणखीच वाढू लागल्या आहेत. राज कुंद्रा याला अटक केल्यापासून आता आठवडा उलटला आहे. त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज देखील दाखल केला होता . मात्र आता हा अर्ज न्यायालयाकडून स्पष्टपणे फेटाळला आहे. परिणामी राज कुंद्राची कोठडी काही सुटेना.

पॉर्न चित्रपट निर्मिती आणि ऍपच्या माध्यमातून प्रसारण या आरोपाखाली शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योजक राज कुंद्रा याला त्याचा साथीदार रायन थॉर्पसह अटक केली होती. या अटकेनंतर दोघांनीही आपल्या सुटकेसाठी जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने हा अर्ज फेटाळल्यामुळे राज कुंद्राला आणखी काही दिवस तुरुंगातच रहावे लागणार आहे. संदर्भात ANIच्या म्हणण्यानुसार, मुंबईच्या एस्प्लानेड कोर्टाने राज कुंद्रा आणि रायन थॉर्पचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

यापूर्वी मंगळवारी (27 जुलै) मुंबईच्या फोर्ट कोर्टाने राज कुंद्राला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी राज कुंद्राला 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. राज कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे डेबिट खाती गोठविली गेली आहेत, अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. सध्या या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगवान पद्धतीने सुरु असून यात ईडीचाही समावेश आहे. त्यामुळे आता संबंधितांची खैर नाही हे स्पष्ट दिसून येत आहे.