Take a fresh look at your lifestyle.

हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; एका मॉडेलसह टीव्ही अभिनेत्रीलाही अटक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून शिल्पा शेट्टीचा पती व उद्योजक राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी केसची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आता यात आणखी एका मोठ्या बातमीने खळबळ उडाली आहे. नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांचने एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य म्हणजे यात एका मॉडेलसह प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा समावेश असल्याची बातमी समोर आली आहे. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्या सेक्स रॅकेटचे धागेदोरे सापडतील अशी माहिती मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी धडक टाकली असता येथून एक टॉप मॉडेल आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री या दोघींनाही अटक केली आहे. या दोन्ही महिला दोन तासांसाठी प्रत्येकी २ लाख रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

खरं तर, उद्योगपती राज कुंद्राचे पॉर्नोग्राफी चित्रीकरण हि एक मोठी हायप्रोफाईल केस असल्यामुळे सगळ्यांचेच त्याकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे. त्यात हे प्रकरण पॉर्न चित्रपटांच्या निर्मिती आणि वितरणाशी संबंधित असल्यामुळे राज कुंद्राला अटक झाल्यानंतरचे मनोरंजन उद्योगातील हे आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस येताच मुंबईतील काही प्रभावशाली लोकांमध्ये आणि अभिनेत्रीच्या ओळखीतील लोकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, क्राईम ब्रांचच्या पथकाने मॉडेल आणि अभिनेत्रीची अटक झाल्यावरही त्यांची ओळख समोर दिलेली नाहीये.

सध्या मनोरंजन विश्वात घडणाऱ्या अश्या धक्कादायक बाबी निश्चितच या क्षेत्राला लागलेली कीड आहे. त्यात सलग अशी एकामागोमाग एक दोन हाय प्रोफाइल प्रकरणे समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वात मोठी खळबळ सुरु आहे. आधीच शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या अश्लील चित्रपट निर्मिती आणि प्रसारण या केसबाबत सर्वत्र विविध प्रकारची चर्चा सुरु आहे. याचे गंभीर परिणाम आधीच मनोरंजन सृष्टीला सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिक्रियांमधून मिळत होते. यानंतर आता आणखी एक असे प्रकरण समोर आल्याने मनोरंजन सृष्टीला जबर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.