Take a fresh look at your lifestyle.

माही विजला बलात्काराची धमकी; अभिनेत्रीच्या व्हिडीओ पोस्टवर मुंबई पोलिसांकडून त्वरित उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री माही विज ही गेल्या बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीत सक्रिय नाही. मात्र तिच्या चाहत्यांची संख्या आजही मोठी आहे. कारण ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. दरम्यान माहीने सोशल मीडिया ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडिया माध्यमात मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडेच तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारची माहिती देताना तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईत भर रस्त्यात माही विजच्या गाडीला धडक दिल्याची घटना समोर आली होती. मात्र हि घटना इतकीच सीमित नव्हती तर दरम्यान धडक दिलेल्या संबंधित व्यक्तीने अभिनेत्रीसोबत अत्यंत वाईट वर्तन केले असल्याची माहिती खुद्द अभिनेत्रीने व्हिडीओ पोस्ट करीत दिली आहे.

दरम्यान अभिनेत्री माही वीजने सांगितले कि, ‘मला शिवीगाळ करत बलात्काराची धमकी देण्यात आली आहे’. अभिनेत्रीच्या धक्कादायक आरोपांसहित तिने शेअर केलेला व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती देताना माहीने अधिकृत सोशल मीडिया ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओ फारसा स्पष्ट नसला तरीही उठलेला गदारोळ स्पष्ट समजत आहे. हा व्हिडीओ तिने ७ मे २०२२ रोजी शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तीने या व्यक्तीवर शिवीगाळ आणि बलात्काराची धमकी देत असल्याचा आरोप केला आहे.

अभिनेत्री माही विजच्या या ट्वीटवर मुंबई पोलीसांनी तातडीने उत्तर देत रिट्विट केले आहे. या रिप्लाय मध्ये मुंबई पोलिसांकडून लिहिले आहे कि, “तुम्ही जवळील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा, याची दखल घेतली जाईल”. विशेष सांगायचे म्हणजे, ही सर्व घटना घडली त्यावेळी तिच्यासोबत तिची मुलगी तारादेखील होती. त्यामुळे सोशल मीडियावर हि बातमी पसरताच चाहते भयंकर संतापले आहेत आणि अनेकांनी ट्विटरवर विविध संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी अभिनेत्रीच्या धाडसाचे कौतुक केले आहे.