Take a fresh look at your lifestyle.

कोरोनामुळे मुंबईची इटली होवू शकते – रंगोली चंडेल

मुंबई | कोरोनामुळे मुंबईची इटली होवू शकते. त्यामुळे मुंबईला एका खंबीर नेत्याची गरज आहे. अस म्हणत कंगनाची बहिण रंगोली चंडेल हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर कडकडीत टीका केली आहे.

कोरोनामुळे मुंबईसमोर आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे’, असं रंगोलीने ट्विटरवर म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना योगी आदित्यनाथ यांच्याकडून काही शिकण्याची गरज आहे’, असा टोमणा ही तिने उध्दव ठाकरे यांना मारला होता.

संपूर्ण महाराष्ट्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचे गोडवे गात असताना रंगोलीने मात्र त्यांच्यावर कडकडीत टीका करून एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आता याच्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.