Take a fresh look at your lifestyle.

मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील..; सुमित राघवनने व्यक्त केला संताप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| अभिनेता सुमित राघवन हा समाजातील विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट मत मांडताना दिसत असतो. सोशल मीडियावर अनेकदा त्याच्या विविध पोस्ट चर्चेत असण्याचे कारणच हे आहे. आताही त्याने अश्याच एका नागरी समस्येवर सगळ्यांचं लक्ष वेधत एक पोस्ट केली आहे. या ट्विटमध्ये सुमित राघवन याने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”, असे लिहीत सत्य परिस्थितीवर बोट ठेवले आहे.

अभिनेता सुमित राघवन याने अधिकृत सोशल मीडिया ट्विटरवर ट्विट करीत नागरिकांचा प्रश्न मांडला आहे. सुमितने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मेट्रो कारशेड स्थलांतरित केलं. पण दहिसर टोल नाका आणि पश्चिम द्रुतगती मार्गावरचं बेकायदेशीर अतिक्रमण याकडे कुणाचं लक्ष नाही. ते हटवण्यासाठी काहीही केलं जात नाही. अश्याने मुंबईकर मुंबईबाहेर स्थलांतरित होतील, अतिक्रमण वाढत जाईल. आणि तुम्हीही या अतिक्रमणग्रस्त शहरात शांततापूर्ण जीवन जगू शकाल”.

याशिवाय सुमितने व्हीडिओच्या माध्यमातून अतिक्रमणावर आपलं मत मांडलं आहे. यात तो म्हणाला, “तीन दिवसापूर्वी ही दुकानं हटवण्यात आली होती. पुन्हा ही दुकानं त्याच ठिकाणी दिसत आहेत. रस्त्याच्या कडेला असं अतिक्रमण करत दुकानं थाटली जातात, त्याला परवानगी कशी मिळते? हे मला जाणून घ्यायचं आहे. मी मुंबई महापालिकेला विनंती करतो की त्यांनी अतिक्रमणाच्या समस्येकडे लक्ष द्यावं आणि त्वरित हा प्रश्न सोडवावा”. सुमित राघवनने अशा प्रकारे नागरिकांशी संबंधित प्रश्न मांडत मुंबई महापालिकेचे लक्ष केंद्रित केले आहे.