हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । ‘बिग बॉस १३’ चा फायनलिस्ट असीम रियाजची फॅन फॉलोइंग सध्या बरीच वाढली आहे. बिग बॉसमधील तो आवडत्या स्पर्धकांपैकी एक होता. बॉलिवूडमध्ये छोट्या छोट्या भूमिका करणारा असीम आता बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. जॅकलिन आणि असिम या दोघांनीही त्यांच्या या आगामी म्युझिक व्हिडिओंची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
या छायाचित्रांमध्ये जॅकलिन एका लेहेंगामध्ये दिसली आहे तर असीमने पांढरा सूट परिधान केलेला आहे. फोटो शेअर करताना जॅकलिनने लिहिले- “असिम प्लीज हसत राहा. हसताना तू शोभून दिसतोस. लवकरच येत आहोत.”
View this post on Instagram
@asimriaz77.official pls smile more it suits you!!
new song coming out soon!!! @tseries.official
सेटवर दुसर्या दिवशी असीमनेहि जॅकलिन फर्नांडिससमवेतच एक छायाचित्र शेअर केला आहे . मी खूप उत्साही आहे लवकरच गाणे प्रदर्शित केले जाईल.
ह्या गाण्याचे राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित तर भूषण कुमार यांनी निर्मिती केली आहे. हे गाणे नेहा कक्कड़ ने गायले असून तनिष्क बागची याने संगीत केले आहे. जॅकलिन फर्नांडिस सुशांतसिंग राजपूत सोबत नेटफ्लिक्सच्या ‘ड्राईव्ह’ चित्रपटात दिसली होती.