Take a fresh look at your lifestyle.

‘हा चित्रपट जरूर पहावा..’; गृहमंत्र्यांकडून ‘द काश्मिर फाईल्स’वर कौतुकाचा वर्षाव

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द काश्मिर फाईल्स’ हा काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाला असून याचे सध्या सर्व स्तरांवरून चांगलेच कौतुक होत आहे. तर या चित्रपटावरुन देशातल्या राजकारणही थोडे नव्हे तर चांगलेच तापले आहे. या चित्रपटावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान त्यांनी म्हटले कि, “ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळेल.

त्याचे झाले असे कि, अहमदाबाद महानगर पालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाविषयी आपलं मत प्रकट केले. ते म्हणाले की, ज्यांनी हा चित्रपट पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, जेणेकरून काँग्रेसच्या काळात काश्मीर किती दडपशाही आणि दहशतीखाली होते हे त्यांना कळेल. गृहमंत्री अमित शहा यांच्या या वक्तव्यामुळे सगळीकडे वेगळीच चर्चा निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिग्दर्शित केलेला ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर आणल्या आहेत. यामध्ये 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस पाकिस्तान समर्थित अतिरेक्यांनी समुदायाला लक्ष्य केल्यानंतर काश्मिरी पंडितांना त्यांच्या मूळ राज्यातून जबरदस्तीने बाहेर काढण्याभोवती फिरते. या चित्रपटाला अनेक भाजप शासित राज्यांनी करमुक्त केले आहे, अशीही माहिती यावेळी मंत्री शहा यांनी दिली.