Take a fresh look at your lifestyle.

‘पानीपत’ चित्रपट आवर्जून बघाच; राज ठाकरे यांनी केले आवाहन

0

बॉलीवुड खबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट वरुन पुढील महिन्यात रिलीज होणारा चित्रपट बघण्याचे आवाहन केले आहे. राज आवाहन करतांना म्हणतात, “दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ह्यांचा मऱ्हाठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्वाच्या लढाईवरचा ‘पानिपत’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच पाहिला. ट्रेलरच इतका सुंदर आहे की चित्रपटाची लढाई आशुतोष जिंकणार ह्याची खात्री आहे. ट्रेलर पहाच पण चित्रपट देखील नक्की पहा.”

इ.स. १७६१ मध्ये मराठा साम्राज्य आणि दुर्राणी साम्राज्य दरम्यान पानिपतच्या तिसर्‍या लढाईदरम्यान घडलेल्या व उलगडल्या गेलेल्या घटनांबद्दल सांगणारा ऐतिहासिक काळातील हा चित्रपट आहे. सदर चित्रपट हा 6 डिसेंबर 2019 रोजी प्रकाशित होत आहे.

दिग्दर्शक: आशुतोष गोवारीकर.
संगीत दिग्दर्शक: अजय-अतुल.
निर्माते: सुनीता गोवारीकर, रोहित शेलटकर.Leave a Reply

%d bloggers like this: