Take a fresh look at your lifestyle.

माझे कष्ट, माझी प्रतिष्ठा इतक्या सहज खराब होतेय; फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पा शेट्टीचे ट्विट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा याच्या मागे जणू अडचणींचे सत्र लागले आहे. एक संपते ना संपते दुसरी समस्या त्यांच्यासमोर उभी राहत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी शिल्पाचा पती राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला होता. आता कुठे ते पूर्ववत जगण्याचा प्रयत्न करू लागले असताना आता मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने शिल्पा आणि राजविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात पतीला अटक झाल्यानंतर शिल्पा फार खचली होती पण तिने यावर काहीही विशेष प्रतिक्रिया कधीच दिली नाही. पण या फसवणुकीच्या प्रकरणानंतर मात्र तिची पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियावर ट्विट करीत समोर आली आहे.

या ट्वीटमध्ये शिल्पाने लिहिले, ‘सकाळी उठले आणि माझ्या व राजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचं मला कळलं. मला धक्का बसला. मी सांगू इच्छिते की, …. एक व्हेंचर आहे, जे काशिफ खान चालवत होता. या ब्रँडच्या नावाने देशभरात फिटनेस जिम उघडण्याचे सर्व अधिकार त्याने घेतले होते. याबाबतच्या सर्व करारावर तो स्वाक्षरी करायचा. बँकिंग आणि इतर नियमित कामाची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्यामुळे त्याच्या कोणत्याही व्यवहाराची आम्हाला माहिती नाही. ना त्याच्याबद्दल आम्हाला काही ठाऊक आहे, ना त्याच्याकडून आम्ही कोणतेही पैसे घेतले आहेत. या सर्व फ्रँचायझीची डील थेट काशिफ खानमार्फत होते. ही कंपनी २०१४ मध्ये बंद झाली असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही काशिफ खानने घेतली होती. मी गेली २८ वर्षे अपार कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे. मात्र इतक्या सहजपणे माझं नाव, माझी प्रतिष्ठा खराब होत असल्याचे पाहून मला फार दु:ख होत आहे. मी या देशाची कायद्याचे पालन करणारी आणि आदर करणारी नागरिक आहे. त्यामुळे मला माझ्या अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे.’

 

त्याचे झाले असे कि, नितीन बराई नामक व्यक्तीने शिल्पा व राज कुंद्राविरोधात २०१४ सालापासून फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, शिल्पा आणि राजसह अन्य आरोपींविरोधात आयपीसी ४०६, ४०९, ४२०, ५०६, ३४ आणि १२० (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपींची चौकशी करून कारवाई करू शकतात.

माहितीनुसार, शिल्पा व राज यांच्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम उघडली तर खूप फायदा होईल, या आशेने बराई यांनी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, बराई यांच्या आरोपानुसार, या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना धमकी देखील देण्यात आली. राज कुंद्रा याला गेलसर जुलैमध्ये पॉर्न फिल्म बनविल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. या आरोपाखाली राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.