Take a fresh look at your lifestyle.

मेरी आवाज हि पहचान है! लता मंगेशकर ते स्वरसम्राज्ञी एक खडतर जीवनप्रवास

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लता मंगेशकर.. या नावापुढे आज गानकोकीळा, भारतरत्न, स्वरदेवी आणि स्वरसम्राज्ञी अशी विशेष नावे जोडली जातात. पण एक काळ असा होता जेव्हा लता मंगेशकर या नावाने ओळख मिळवण्यासाठी फार धडपड केली होती. ‘आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ याचा प्रत्यय हा लता दीदींच्या जीवनप्रवासातून मिळतो. आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ असून सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी लता दीदी यांनी संपूर्ण जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच त्यांच्या प्रियजनांनी आणि चाहत्यांनी टाहो फोडला. आज संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी शासकीय इतमामात मुंबईतील शिवाजी पार्क येथे दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुरांच्या जगाला विशेषत्व प्राप्त करून देणाऱ्या स्वर सम्राज्ञी लता दीदी यांचा जीवनप्रवास कसा होता आणि कोणकोणत्या परिस्थितीवर त्यांनी मात केली हे आपण जाणून घेऊया.

 

लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर, मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. लता दीदी याना एकूण ४ भावंडे अशी हि पाच भावंडे. लता दीदी या सर्वात मोठ्या असल्यामुळे त्यांच्यावर आपल्या भावंडांची जवाबदारी होती. यामुळे मीना मंगेशकर, आशा भोसले आणि उषा मंगेशकर, भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर या भावंडांना त्यांनी नेहमीच साथ दिली. आज या सर्वच भावंडांनी संगीतक्षेत्रात आपलं स्वतंत्र अस्तित्व मिळवलं आहे. मात्र लता दीदी यांच्यामध्ये नेहमीत खास आहेत. कारण लता दीदी १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडीलांचे निधन झाले.

पुढे त्यांच्या वडीलांचे मित्र आणि नवयुग चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक लता दीदींना गायन आणि अभिनयाच्या क्षेत्रात घेऊन आले. उभे लता दीदींनी या क्षेत्रात यशाचा उच्चांक गाठला आणि नाव कमावलं. पूर्ण आयुष्यभर साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांनी लीलया सांभाळली. अगदी कमी वयातच त्यांच्या नाजूक खांद्यांनी कुटुंबाची जबाबदारी उचलली. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांनी लग्नदेखील केलं नाही.

लता दीदींच्या आयुष्यात त्यांनी मागे वळून पाहिलं नाही तर सर्वाना एकत्र घेऊन जाण्यात विश्वास ठेवला. प्रेम, माया आणि वास्तल्य.. त्यांच्या स्वरात सरस्वती माता स्थित होती. मात्र लता दीदींनी देखील खडकातून आपले अस्तित्व प्रस्थापित केले होते. एक काळ असा आला होता कि सगळं काही संपत का काय? अशी भीती त्यांच्याही मनाला आणि करिअरला लागून गेली होती. ‘बीस साल बाद’ या सिनेमाचं गाणं रेकॉर्ड करण्यासाठी रेकॉर्डिंगची तयारी झाली. मात्र लता दीदी अस्वस्थ होत्या. सगळं काही तयार असताना नेमक्या लता मंगेशकर रेकॉर्डिंगसाठी जाऊ शकल्या नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Career Craft (@career__craft)

अंगात कणकण, अस्थिर तब्बेत, पोटात प्रचंड वेदना. लता दीदींची तब्येत फारच खराब झाली. काही दिवस उलटले पण त्यांची तब्येत जैसे थे! डॉक्टरांनी लतादीदींना तपासल्यानंतर समजले कि त्यांना फुड पॉयझनिंग झाले होते. हे कळल्यानंतर घरातल्या सगळ्यांना लतादीदींना विष देण्याचा कुणीतरी प्रयत्न करतंय अशी शंका आली. त्यामुळे स्वतः उषा मंगेशकर यांनी मीच जेवण बनवणार आणि तिला भरवणार असे खडसावून सांगितले. लता दीदींची आजारातून उठण्याची पूर्ण खात्री सोडली होती. मात्र काही दिवसांतच त्या उठून बसल्या आणि पुन्हा एकदा कामावर रुजू झाल्या.

पुढे १९४५ साली लता दीदी मुंबईत आल्या आणि त्यांनी गायन क्षेत्रातच करिअर करण्याचा पक्के ठरवले. त्यांनी मुंबईतील भेंडी बाजार येथे उस्ताद अमन अली खान यांच्याकडून हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिकचे प्रशिक्षण घेतले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना १९४५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मॉं’ या चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. यानंतर जिद्दी, आझाद, बडी बहन, महल गाईड, कोरा कागज अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी अजरामर गाणी गायली. इतकेच नव्हे तर चांदनी, राम लखन, सनम बेवफा, पत्थर के फूल, डर ते अगदी दिलवाले दुल्हेनिया ले जाएंगे, माचिस, दिल ते पागल है, रंग दे बंसती, कभी खुशी कभी गम, वीर झारा अशा अनेक चित्रपटांमध्येदेखील त्यांनी एकापेक्षा एक गाणी गायली आहेत.

लता मंगेशकर या सर्वात प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका होत्या. आजतागायत त्यांनी ५० हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि छत्तीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. यात मुख्यतः हिंदी आणि मराठी भाषेचा उल्लेख आहे. लता मंगेशकर यांना गानसम्राज्ञी, गानकोकिळा आणि राष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

यामध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार याशिवाय पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण, भारतरत्न, लीजन ऑफ ऑनर या पुरस्कारांचा समावेश आहे. एवढंच नाही तर न्युयॉर्क युनिव्हर्सिटी सारख्या अनेक युनिव्हर्सिटीमध्ये मानद ‘डी. लिट’ पदवीने सन्मानित करण्यात आलेलं आहे. भले आज लता दीदी देहाने आपल्यात नसतील पण त्यांच्या स्वरांची देणगी अमूल्य आले. त्यांचे स्वर आणि त्यांचा आवाज त्यांचीच नव्हे संपूर्ण राष्ट्राची ओळख आहे आणि हि ओळख सूर्य आणि चंद्र यांच्या अस्तित्वासोबत कायम राहील.
लता दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!