Take a fresh look at your lifestyle.

कंगणा महाराष्ट्राची बदनामी करतेय ; ‘ही’ अभिनेत्री कंगणावर भडकली

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त वक्तव्या मुळे चर्चेत आली आहे.नुकतंच कंगणाच मुंबईस्थित कार्यालयातील बेकायदेशीर बांधकामांना बीएमसीने तोडले आहे. त्यानंतर कंगना बीएमसीच्या या कारवाईबद्दल सतत ट्विट करून नाराजी व्यक्त करीत आहे.

अशा परिस्थितीत काही लोक कंगनाला पाठिंबा देताना दिसत आहेत, तर काही तिच्या विरोधातही आहेत. दरम्यान, अभिनेत्री नगमाने कंगना रनौतच्या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री कंगना रनौत महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी करीत आहे, असे नगमा म्हणाल्या.

नगमा यांनी ट्विट केले की, ‘कंगना रनौत महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी करीत आहे. जगभरात मुंबई आणि महाराष्ट्राचे नाव खराब करण्यात तिचे मोलाचे योगदान आहे. ती संपूर्ण बॉलिवूडला बदनाम करीत आहे. तिने प्रथम नेपोटिझमपासून सुरुवात केली, नंतर इनसाइडर विरुद्ध आऊटसाइडर आणि आता मुंबईचे वर्णन पाकव्याप्त काश्मीर अस केलं आहे.

दरम्यान, मुंबई वरून कंगना विरुध्द शिवसेना हा वाद अजून पेटण्याची शक्यता आहे.आणि त्यात अनेक राजकारणी तसेच बॉलीवूड कलाकारही या वादात उडी घेताना दिसत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’