Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नाळ 2’च्या नावानं चांगभलं; नागराज मंजुळेंच्या पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 1, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Naal 2
0
SHARES
145
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आजतागायत अनेक वास्तववादी कथा चित्रपट स्वरूपात प्रेक्षकांसमोर आणल्या. यांपैकी फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड या चित्रपटांनी बॉक्स ऑफिस प्रचंड गाजवलं. या चित्रपटांच्या माध्यमातून मंजुळे यांनी समाजातील वंचितांचे प्रश्न आणि अबोल विषय बोलके केले. या कलाकृतींना अनेक दिग्गजांनी सलाम ठोकला. अतिशय संवेदनशील विषय कुणाच्या भावना न दुखावता सादर करण्याची एक विशेष कला नागराज मंजुळे यांच्याकडे आहे. यानंतर आता नागराज यांनी एक पोस्ट शेअर करत नाळ चित्रपटाचा सिक्वल येत असल्याची घोषणा केली आहे. यामुळे त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आनंदी आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘मागच्या महिन्यात सुधाकरने Sudhakar Yakkanti अचानक फोन करून सांगितलं की, नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात…? नाळचा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की, दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या “नाळ” प्रमाणेच ‘नाळ’चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! “नाळ 2” नावानं चांगभलं !!!’

View this post on Instagram

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

हि पोस्ट शेअर करून काहीच तास झाले असता चाहत्यांनी आणि प्रेक्षक वर्गाने मोठ्या संख्येने यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘नाळ’ हा चित्रपट आई मुलाच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांच्या काळजाला आधीच हात घातला आहे. त्यामुळे नाळ २ या सिक्वलकडून फार अपेक्षा आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात नागराज मंजुळे आणि देविका दफ्तरदार हे प्रमुख भूमिकेत होते. तर नागराज यांनीच चित्रपटाची निर्मितीही केली होती. अनेक पुरस्कार प्राप्त आणि प्रचंड यश मिळवलेल्या ‘नाळ’ चित्रपटाने अनेकांना आपल्या नात्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला होता.

Tags: Facebook PostInstagram PostNaal 2nagraj manjuleViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group