Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आई अंगाई म्हण ना! त्याच्या ह्या वाक्याने माझा कंठ..’; ‘MHJ फेम नम्रता संभेरावची लेकासाठी भावनिक पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Namrata Rudraraj
0
SHARES
296
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रकाश झोतात आलेली अभियनरी नम्रता संभेराव एक अन एक पात्र अव्वल साकारते. तिने साकारलेली लॉली, नाठाळ सून, मिश्किल बायको आणि अगदी पावली कोहली या प्रत्येक भूमिकेतून नम्रता घराघरात पोहोचली आणि मनामनात वसली आहे. हे कलाकार कामावर येताना घरी बरंच काही सोडून येत असतात.

View this post on Instagram

A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

अगदी आपली मुलंसुद्धा.. मनात नसतानाही जबाबदारीपायी मुलांना एकटं सोडून हे कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये म्हणून अविरत कार्यरत असतात. अशावेळी मुलांसाठी आपण कुठे कमी तर पडत नाही ना.. अशी एक अपराधी भावना आपसूकच त्यांच्या मनात येते. आज नम्रता संभेरावचा मुलगा रुद्रराजचा वाढदिवस आहे आणि या निमित्त तिने लेकासोबतच गोड फोटो शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

या फोटोत नम्रता आणि तिचा लेक दोघेही एकमेकांसोबत किती गोड तसेच आनंदात दिसत आहेत. आज लेकाच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना हसवणारी नम्रता मात्र भावनिक होत व्यक्त झाली आहे. नम्रताने हि पोस्ट शेअर करताना लिहिलंय कि, ‘रुद्रराज वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आज आमच्या बाळाचा वाढदिवस!! आम्ही दोघांनी ठरवलं थोडं जगून घेऊया थोडा वेळ जाऊदे मग चान्स घेऊया, जगलो हसलो रडलो भांडलो आता जरा आई बाप व्हायचा स्टान्स घेऊया, वाटलं एखादं लेकरू असावं.. ज्याला कडेवर घेऊन मिरवावं.. त्याने आई म्हणत उराशी बिलगावं…! एक मात्र मला कळून चुकलं, तुम्ही लेकरं आमच्या इच्छेनुसार नाही तर तुमच्या इच्छेनुसार आयुष्यात येता आणि आम्हा आई बापाच्या जगण्याला खरा अर्थ देता..

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

 

आणि मग स्वप्न आमचं पूर्ण झालं, उदरी माझ्या लेकरू आलं.. त्याच्या येण्याने एक आवर्तन पूर्ण झालं..
पूर्वी वाटायचं हा मला जीव लावेल का..? मी कामावर गेले कि माझ्या मागे धावेल का..?
पण माझ्याशिवाय त्याच आता पान हलत नाही.. मी कामाला गेले कि तुझ्याविना माझं मन रमत नाही…
कधी कधी मनात खूप अपराधी भावना येते.. पण हे सगळं प्रत्येक आई आपल्या बाळासाठीच तर करते..
प्रत्येकवेळी त्याच्या आई ह्या हाकेने माझा उर भरून येतो.. आई अंगाई म्हण ना ह्या वाक्याने कंठ माझा दाटून येतो..
आई मी तुझ्या कुशीत झोपू म्हणजे मला झोप लागेल हे वाक्य ऐकल्यावर मात्र माझी झोप उडते.. मग त्याच्या कुशीत जाऊन कधी कधी मी एकटीच रडते.. त्याच हसणं बघितलं कि आयुष्य माझं वाढतं आणि एका गोड बाळाची आई म्हणून थोडं मूठभर मांस देखील चढतं’

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

नम्रता संभेरावची हि पोस्ट एका अभिनेत्रीने नव्हे तर तिच्यातल्या आईने लिहिली आहे हे लगेच समजतं. अगदी टचकन डोळ्यात पाणी आणेल अशी आणि उर भरेल अशी हि पोस्ट आहे. या पोस्टवर नम्रताच्या अनेक मित्र मंडळींनी रुद्रराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद दिले आहेत. याशिवाय नम्रताच्या चाहत्यांनी आणि अन्य नेटकऱ्यांनीदेखील या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत रुद्रराजला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: Instagram PostMarathi ActressNamrata SambheravViral PhotoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group